आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या ट्रेनरवर एका दिवसाला खर्च होतात 90 हजार रुपये, जाणून घ्या सिनेसृष्टीतील FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोरंजन जगताच्या वर्तमान आणि भविष्याशी खोलवर नाते असलेल्या दोन बातम्या वाचनात आल्या. पहिली बातमी दुबईत दीपिका पदुकोणसोबत तिचा ट्रेनर तिच्यासोबत गेला असून त्याचे दैनिक मानधन 35 हजार रुपये आहे. राहण्याचा आणि इतर खर्च मिळून 90 हजार रुपये होतो. दीपिकाच नव्हे तर सगळ्या मोठया कलावंतांसोबत अर्धा डझन सहायक जातात. निर्माताच त्यांचा खर्च उचलतो.
दुसरी बातमी ‘ओपन’ नावाच्या पत्रिकेत लेहन्दुम जी. भुटिया यांच्याकडून मिळाली. आसाममधील अनुभव नसलेल्या केनी बासुमत्यारी या तरुणाने ‘लोकल कुंग फू’ नावाचा चित्रपट फक्त 95 हजारमध्ये बनवला आहे. जितका पैसा दीपिकाच्या एका ट्रेनरवर खर्च होतो. या तरुणाने चित्रपट पाहून एक पटकथा लिहिली. कोणताही निर्माता कथा वाचू इच्छित नव्हता. त्याचा उत्साह पाहून त्याच्या आईने आपल्या जीवनभरची साठवलेली कमाई 60 हजार रुपये त्याला दिले आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी 35 हजार रुपये दिले. अशा प्रकारे एकूण जमवलेल्या 95 हजार रुपयांत त्याने कॅनन 550 डी नावाचा डिजिटल कॅमेरा 44 हजार रुपयांत विकत घेतला आणि इतर उपकरणांवर खर्च केल्यानंतर त्याच्याजवळ फक्त 28 हजार उरले.