आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन आंखों के सिवा दुनिया में क्या रखा है ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिमल राय दिग्दर्शित ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुचित्रा सेन अत्यंत सर्मपित आणि शिस्तप्रिय अभिनेत्री असल्याचे दिलीप कुमार म्हणाले होते.
देवदासमधील प्रेमदृश्ये फक्त डोळ्यांनीच व्यक्त होत होती. दोघांनी कधीच एकमेकांना स्पर्श केला नाही. जणू काही सुचित्रा सेनच्या डोळ्यांमध्ये जादू होता असे वाटायचे. ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दिलीप कुमार यांनी मान्य केले की, बंगाली चित्रपटात सुचित्रा सेन आणि उत्तम कुमारमध्ये जी केमिस्ट्री होती ती देवदासमध्ये दिसली नाही. खरंच, ही आश्चर्याची गोष्ट आहे की, दोन कलावंतांमध्ये एक अदृश्य नाते तयार होते जे फक्त कॅमेर्‍यासमोरच दिसते.
मीना कुमारीने आजारपणातच ‘पाकीजा’ चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची शूटिंग केली. जेव्हा कॅमेरामॅन इतर कामात व्यग्र असायचा तेव्हा मीना कुमारी निर्जीव व्यक्तीप्रमाणे दिसायची. इतकी अशक्त दिसायची की पुढचा शॉट देईल की नाही याचा विश्वास वाटत नव्हता. मात्र, शॉट रेडी होताच कॅमेर्‍यासमोर कुणास ठाऊक कशी सजीव व्हायची. ते पाहून कॅमेर्‍यातून ऊर्जा तिच्या शरीरात शिरतेय की असे वाटायचे. निर्जीव धातू आणि प्लास्टिकपासून तयार झालेला कॅमेरा सुरू होताच कुणास ठाऊक कशी कलावंतांमध्ये ऊर्जा येते. सामान्य जीवनातदेखील कुटुंबाच्या लोकांची बसण्याची ठरावीक जागा असते. मात्र, हे कोणत्याही व्यवस्थेअंतर्गत येत नाही. एकदा ठरल्यानंतर कुटुंबाचा सदस्य त्याच जागेवर बसणार असे समजले जाते. मात्र, खुर्ची बदलल्यानंतर माणूस थोडा अस्वस्थ होतो. जणू काही निर्जीव वस्तूचीदेखील ओढ लागते. वस्तूंविषयी इतकी संवेदनशील व्यक्ती स्वत:च्या वागणुकीत संवेदनाहीन यंत्रासारखी वाटते. ही गोष्ट या नात्यापेक्षादेखील जास्त खोल आहे. ती निदा फाजली यांनी आपल्या शेरमध्ये व्यक्त केली आहे, ‘चीखे घर के द्वार की लकडी हर बरसात, कर कर भी मरते नहीं पेडों में दिन रात’. साध्या दिसणार्‍या जगाची दैनिक कार्यपद्धती अत्यंत रहस्यमय आहे.
सुचित्रा सेन पापण्या न लवता बराच वेळ पाहू शकत होत्या. त्यांच्या डोळ्याच्या पडद्यावर विविध भाव व्यक्त व्हायचे. अशाच एखाद्या भावनेच्या क्षणात त्यांच्या ओठांवर शहारे यायचे आणि कधी-कधी ते किंचित वाकडेदेखील दिसायचे. शर्मिला टागोर एकदा म्हणाल्या होत्या की, सुचित्रा सेन जितक्या लोकप्रिय कलावंत होत्या, तितक्या मोठय़ा कलावंत नव्हत्या. सुचित्रा सेन एकमेव अशी अभिनेत्री आहे, ज्यांनी सत्यजित रे यांचा एक चित्रपट ऐनवेळी नाकारला होता आणि राज कपूर यांचा प्रस्तावदेखील नाकारला होता. अनेकदा केलेल्या चित्रपटामुळे कलाकाराची चर्चा होत नाही, मात्र नाकारलेल्या चित्रपटामुळे त्यांची बरीच चर्चा होते. मुंबईचे निर्माते रमेश बहल एकदा सुचित्रा यांची मुलगी मुनमुनसोबत कोलकात्याला गेले होते. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला होता.
सुचित्रा सेन एक असामान्य महिला होत्या. भारतीय सिनेमामध्ये त्यांचे एक मोठे स्थान आहे. सर्वाधिक आवडीवर आधारित माध्यमात सुचित्रा यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवली. लोकप्रियतेसाठी कोणतेही काम केले नाही. शरीराचे सौंदर्य आणि कोमलतेने चारित्र्याचा अंदाज येत नाही.