आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभना सर्मथ, तनुजा, नुतन ते काजोलपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी तनुजाने नितीश भारद्वाज यांच्या प्रवाहातून वेगळ्या बनलेल्या मराठी ‘पितृऋण’ चित्रपटासाठी मुंडण करून घेतले होते. चित्रपटाचे कौतुक झाले. मात्र, त्याने कमाई केली नाही. आजचे प्रेक्षक तनुजाला काजोलची आई म्हणून ओळखतात. एकेकाळी तनुजा शोभना सर्मथची मुलगी म्हणून ओळखली जात होती. तर दीर्घकाळ नूतनची छोटी बहीण म्हणूनदेखील ओळखली गेली. पाचव्या-सहाव्या दशकात बंद समाजात आपल्या खुलेपणासाठी तनुजाला खूप टीका सहन करावी लागली. कारण तिच्या समकालीन महिला कलावंत खुलेआम दारू पीत नव्हत्या. खुलेआम सिगारेट ओढणे स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुषांनादेखील अवघड वाटत होते.
मीडियाने बिनधास्त शब्दाचा प्रयोग पहिल्यांदाच तनुजासाठी केला होता. तिने विजय आनंद यांच्या ‘ज्वेलथीफ’मध्ये एक आयटम साँग केले होते. तसेच अनेक चित्रपटांत तिने नायिकेची भूमिका वठवली आणि कौतुकही मिळवले. रणधीर कपूरसोबत तिचा ‘हमराही’ नावाचा विनोदी चित्रपट यशस्वी ठरला होता. तनुजाने त्या काळीदेखील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात नि:शुल्क काम केले. ज्याप्रमाणे बासू भट्टाचार्य यांच्या ‘अनुभव’ मध्ये काम केले होते.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...