आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूर आणि अलिया भटची प्रेमकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या चित्रपट उद्योगात एका प्रेमकथेची चर्चा होत आहे. महेश भटची मुलगी अलिया आणि बोनी कपूरचा मुलगा अर्जुनमध्ये मधुर संबंध जुळले आहेत. त्याच्यासोबत वेळ घालवणे चांगले वाटते. मात्र, तो माझा प्रेमी किंवा पती नाही, आम्ही नेहमी भांडण करत राहतो, अशी अलिया म्हणाली आहे. अर्जुन कपूर आणि अलिया भट ‘टू स्टेट्स’ नावाच्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यात एक पंजाबी तरुण आणि तामिळ भाषा बोलणार्‍या मुलीची प्रेमकथा आहे. त्यासाठी अलिया तामिळ शिकली आहे.
मात्र, चित्रपटात तामिळ भाषेचा प्रयोग चेन्नई एक्स्प्रेससारखा करण्यात आला आहे. त्यामुळे अखिल भारतीय प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही. खरे तर चित्रपटाची भाषा शास्त्रीय मापदंडावर शुद्ध नसते, ती एक लोकप्रिय आवृत्ती असते. चित्रपटाच्या मिक्सरमध्ये दळून भाषेचे रूप बदलून जाते. खरे तर आजकाल वृत्तपत्र आणि पत्रिकेत भाषेच्या शुद्धतेचा मुद्दाच राहिलेला नाही. सगळ्याच ठिकाणी लोकप्रियच वाढले जात आहे. खाणार्‍यांना यावर आक्षेप नाही, तर इतरांनी का आक्षेप घ्यावा? अशा प्रकारेच अपसंस्कृती पसरत आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...