आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करमधून बाहेर ‘हर’ चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्करसाठी नामांकित चित्रपटांपैकी ‘हर’देखील एक चित्रपट होता. मात्र, त्याला पुरस्कार मिळाला नाही; पण चित्रपट अनेक प्रश्नांना जन्म देतो. कथा सरळ आहे, नायकाचा घटस्फोट झालेला असतो आणि तो एकदम एकटा असतो. ज्या लोकांकडे पत्र लिहिण्याचा वेळ नसतो आणि ते प्रभावीपणे भाव व्यक्त करू शकत नाहीत, अशा लोकांना तो पत्र लिहून देत असतो. हाच त्याचा व्यवसाय असतो. अनेक गावांमध्ये आजही पोस्ट ऑफिसच्या बाहेर पैसे घेऊन पत्र लिहिण्याचा व्यवसाय लोक करतात. मात्र, ते अशिक्षित लोकांसाठी काम करतात. श्याम बेनेगल यांनी या विषयावर चित्रपट बनवलेला आहे. इंग्रजी चित्रपटाचा नायक अशिक्षित नव्हे, तर शिक्षित लोकांसाठी पत्र लिहितो.

कॉलेज परिसरात लोकप्रिय विद्यार्थ्याचे प्रेमपत्र त्याचा एखादा मित्र लिहीत असतो. हा लोकप्रिय छात्र चांगले बोलतो, कपडे चांगले घालतो, कॅम्पसमध्ये हीरो मानला जातो. मात्र, त्याला प्रेमपत्र लिहिता येत नाही. ही गेल्या जमान्याची गोष्ट आहे. आता तर एसएमएस केला जातो, ई-मेल पाठवला जातो. सध्या प्रेमपत्र नावाच्या कलेचा लोप झाला आहे. असो, नेत्यांसाठीदेखील भाषण लिहिण्यासाठी लोक असतात. हे भारतातच नव्हे, तर सगळ्या देशांत होत असते. या लोकांना घोस्ट रायटर म्हणतात. आजकाल तर नेते भाषण देण्याची कला रंगमंचाच्या कलावंतांकडून शिकतात. त्यांचे सगळे काम विदेशी प्रचार संस्था ठरवतात.

एका प्रसिद्ध राजकुमारासाठी प्रेमपत्र लिहिता-लिहिता तो राजकन्येसोबत प्रेम करू लागतो. कालांतराने राजकुमारचे लग्न त्याच राजकुमारीसोबत होते. काही वर्षांनंतर तो लढाईत मारला जातो. नंतर घटनाक्रम असा फिरतो की, त्या माणसाच्या मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी विधवा राजकुमारीला कळते की, तिच्या नवर्‍याच्या प्रेमपत्रांचा लेखक हा माणूस होता. त्या चित्रपटातील एक संवाद नेहमी बोलला जातो, ‘आय लव्हड वन्स बट लॉस्ट ट्वाइस’. हॉलिवूडच्या ‘शी’ चित्रपटातील घटस्फोटित नायकाला एका विशेष प्रकारच्या प्रोग्राम्ड कॉम्प्युटरची माहिती मिळते, ते महिलेच्या आवाजात एकट्या व्यक्तीशी बोलत असते. हे कॉम्प्युटर नायकापेक्षा जास्त हुशार असते आणि चर्चेच्या माध्यमातून पत्नीची उणीव पूर्ण करते, आवाजाच्या पातळीवर ती एक पूर्ण पत्नीच आहे. चित्रपटात नायकाचे नाव श्यो असते, तर कॉम्प्युटर ‘पत्नी’चे नाव समंथा आहे. समंथा प्रोग्राम्ड आहे. पत्नीसारखी रुसते आणि भांडण करण्यासाठीदेखील तयार असते.

आजकाल दीर्घकाळ घराबाहेर राहणार्‍या पतींच्या पत्नींसाठीदेखील अशा प्रकारचे कॉम्प्युटर बनवले जात आहेत. विभक्त झालेल्या व्यक्तीच्या एकटेपणात औषधासारखे काम करणारे यंत्र तयार केले जात आहेत. खरे तर, हॉलीवूडने नेहमीच विज्ञानपटात दार्शनिकतेचा टच दिला आहे. 1932 मध्ये चार्ली चॅप्लिनने गांधीजींची भेट घेतली होती. त्या वेळी गांधीजीने यंत्राचा विरोध करण्याचे कारण समजावून सांगितले होते. यंत्र साम्राज्यवादी ताकदीच्या हातात गुलाम देशांच्या लोकांचे शोषण करते. शिवाय यंत्रावर निर्भरता कालांतराने माणसाला यंत्राचे गुलाम बनवून टाकेल अशी दार्शनिक चिंतादेखील गांधीजींना होती. हीच चिंता ‘स्पेस ओडेसी 2001’ आणि ‘मॅट्रिक्स शृंखला’मध्ये दाखवण्यात आली आहे. विज्ञान माणसाच्या सगळ्या समस्या आणि उणिवांचे समाधान शोधते. मात्र, त्याच्या समाधानाबरोबरच काही नव्या प्रश्नांचा जन्म होतो.

राजेंद्र कुमार अभिनीत एक गीत आठवते, ‘एक सवाल मैं करूं, एक सवाल तुम करो और सवाल का जवाबही सवाल हो.’ माणूस यंत्र बनवतो, आतापर्यंत कोणत्याही यंत्राने माणसाला बनवले नाही; पण मानवी मेंदूची ताकद संवेदनेच्या प्रश्नावर कुणास ठाऊक का मौन होते? विज्ञानाचा विश्वास आहे की, संवेदना प्रोग्रामचा भाग होऊ शकतो. मशीन संवेदनेची पुनरावृत्ती करता-करता कधी-कधी संवेदनशील होते. ही अतिरिक्त संवेदना त्याच्या प्रोग्रामच्या पलीकडे आहे. स्टीव्हन स्पिलबर्गच्या इंटेलिजेंसमध्ये रोबोट आपल्या मालकिनीला कॅन्सर झाल्यावर रडू लागते. तथापि, अर्शू प्रोग्राम्ड नव्हते. विज्ञानात माणसाचे हित जुडलेले आहे. मात्र, बाजार फक्त फायद्यावर टिकलेला आहे. असो, जूनमध्ये लडाखमध्ये अशा चित्रपटाचा उत्सव होणार आहे, जो अध्यात्माशी जोडलेला आहे आणि दलाई लामा या समारंभाचे उद्घाटन करणार आहेत.