Home | Feature | Salman Khan to romance 10 heroines in his next

OMG: सलमान खान करणार 10 heroinesशी रोमँस? करणार का ‘नो एन्ट्री में एन्ट्री’?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2015, 05:10 PM IST

सलमानला ह्या चित्रपटात एक नाही दोन नाही तर तब्बल १० हिरोईन्स असणार आहेत.

 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  सलमान खान आणि त्याच्या हिरोईन्स
  सलमान खानची २००५ मधली सुपरहिट फिल्म ‘नो एन्ट्री’चा सिक्वल बनवावा, असे निर्माता बोनी कपूरला गेली काही वर्ष वाटतं आहे. पण सलमान खान हा खूप बिझी स्टार असल्याने बोनी कपूरला 'नो एन्ट्री'चा सिक्वल 'नो एन्ट्री में एन्ट्री'साठी काही सलमानच्या डेट्स मिळत नाहीयेत.
  गेली तीन वर्ष सलमानच्या तारखा मिळवण्याचा प्रयत्न बोनी कपूरने केला होता. पण त्या न मिळू शकल्याने सलमानशिवाय आता ही फिल्म बनणार असेही समोर आले होते. पण नुकत्याच हाती आलेल्या सूत्रांनूसार, सलमान खानशी लवकरच निर्माता बोनी कपूर मिटींग करणार आहे. आणि फिल्म लवकर सुरू करण्याचा बोनी कपूरचा प्रयत्न असेल.
  दिग्दर्शक अनीस बझमीने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनुसार तर 'सलमानला ह्या चित्रपटात एक नाही दोन नाही तर तब्बल १० हिरोईन्स असणार आहेत. आणि सलमानने शुटिंगसाठी त्याच्या तारखा दिल्या, तर लगेच त्याच्या हिरोईनचे कास्टिंग सुरू होईल'
  पुढील स्लाइडमध्ये वाचा कोण असतील सलमान खानच्या ह्या १० हिरोइन्स ?

 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  दिपीका पदूकोण –
   
  दिपीका पदूकोणने आपल्या मुलाखतींमधून तिला सलमानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे म्हटलेच आहे. त्यामुळे त्या दहामधली एक हिरोइन जर दिपीका असेल, तर त्या दोघांच्याही चाहत्यांना नक्कीच आवडेल. त्यात दिपीकाने आपलं कॉमिक टाइमिंग चांगलं असल्याचे तिच्या ‘हॅपी न्यू इयर’मधून दाखवलेच आहे. उत्तम कॉमेडी करू शकणा-या सलमानसोबत दिपीकाचे कॉमेडी टायमिंग पाहणे, औत्सुक्याचेच असेल. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची दूसरी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  अनुश्का शर्मा –
   
  अनुश्काने आपलं कॉमिक टायमिंग तिच्या यशराज बॅनरच्या फिल्ममधनं दाखवलंय. NH-10 मधनं तिचा परफॉर्मन्स ओरिएन्टेड रोल पाहिल्यावर आता तिला, सलमान खानसोबत कॉमेडी करताना पाहणं, हे तिच्या करीयरसाठी अजून एक माइलस्टोन असेल. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची तिसरी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  करीना कपूर –
   
  'बजरंगी भाईजान'नंतर सलमान खान आणि करीना कपूर ह्यांना एकत्र पाहणे, हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक सुखद अनुभव असेल. दोघांचेही फार पूर्वीपासून घरचे संबंध आहेत. करीनाची मोठी बहिण करिश्मा कपूर, ही सलमान खानची जवळची मैत्रिण आहेच. करीनाचा नवरा सैफ अली खान, सुध्दा सलमानचा खूप पूर्वीपासूनचा मित्र आहे. आणि सलमान आणि करीनाची केमिस्ट्री तर नेहमीच सिल्व्हर स्क्रिनवर छान फुलून आलीय. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची चौथी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
   
  कैटरीना कैफ –
   
  सलमान खाननेच तिला फिल्म इंडस्ट्रीत आणलं. हिंदी शिकवण्यापासून ते अभिनय करवून घेण्यापर्यंत, सलमान खानने तिच्या करीयरसाठी खूप मेहनत घेतलीय. आता जरी कैटरीना सलमानला सोडून रणबीर कपूरला डेट करत असली तरीही ती आजही सलमान आणि त्याच्या कुटूंबियांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सलमान खानसोबत फिल्म करायला ती कधीच नाही म्हणणार नाही. आणि ब-याच अवधीनंतर त्या दोघांना एकत्र पाहणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आवडणारंच असेल. त्यातच दिग्दर्शक अनीज बझमीच्याच ‘वेलकम’ ह्या सिनेमात ती होती. त्यामुळे दिग्दर्शकासोबतही तिचा छान रॅपो आहेच. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची पाचवी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  प्रियंका चोप्रा –
   
  प्रियंका चोप्रा आणि सलमान खानला ‘मुझसे शादी करोंगीं’मध्ये एकत्र पाहिलं होतं. पण आता त्यांच्या चाहत्यांना त्यांची सिल्व्हर स्क्रिनवरची ही केमिस्ट्री पाहून अनेक वर्ष झाली आहेत. प्रियंका आणि सलमानचं मध्यंतरीच्या काळात काही बिनसलं असल्याची चर्चा होती. पण आता त्यांचं पॅचअप सुध्दा झालंय. त्यामुळे त्यांची पून्हा सुरू झालेली ही मैत्री एखाद्या सिनेमात पाहता आली, तर हा सिनेमा पाहण्याचे एक छान कारण त्यांच्या चाहत्यांना मिळेल. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची सहावी  हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  प्रीटी झिंटा –
   
  सलमान खानची जवळ जवळ १५ वर्षांपासूनची मैत्रिण. सलमान खानला ती कधीच कोणत्याच प्रोजक्टसाठी नाही म्हणूच शकत नाही. प्रीटी झिंटाने स्वत:ची होम प्रॉडक्शन फिल्म बनवून त्यात  एका गाण्यासाठी सलमानला बोलवलं खरं. पण प्रेक्षकांना सिनेमाहॉलमध्ये आमंत्रण देण्याचा हा एक असफल प्रयत्नच ठरला. आणि आता तिला आपलं करीयर संपवून गाशा गुंडाळण्याची परिस्थिती आलीय. तिच्यासाठी सलमानसोबत फिल्म करणं त्यामुळेच खूप महत्वाचे झालेय. मध्यंतरी तिच्याबाबत झालेल्या क़ॉन्ट्रोवर्सीतून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या करीयरला नवी उभारी देण्यासाठी तिला एक फिल्म सलमानसोबत करणे गरजेचे आहे.  
   
   
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची सातवी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  सोनाक्षी सिन्हा –
   
  सलमान खानची 'दबंग'गर्ल सोनाक्षी सिन्हा 'दबंग-३'मध्ये नसल्याची बातमी आली. आणि सलमान खान आणि सोनाक्षीला पून्हा पाहण्याचे त्यांच्या चाहत्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. सोनाक्षीची कॉमिक टायमिंग जरी तिच्या चाहत्यांनी पाहिली असली. तरी सोनाक्षी आणि सलमान ह्यांची क़ॉमिक टायमिंग आत्तापर्यंत व्यवस्थित त्यांच्या फिल्ममधून दिसली नाही. त्यामुळे जर सोनाक्षी सलमानसोबत दिसली, तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक मनोरंजक अनुभव असले. 
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची आठवी हिरोईन
   
   
   
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  सुश्मिता सेन-
   
  'मैनें प्यार क्यों किया' म्हणत सुश्मिता आणि सलमानने केलेला सिल्व्हर स्क्रिनवरचा रोमँस त्यांच्या चाहत्यांना आजही लक्षात आहे. ब-याच अवधीपासून सुश्मिताने कोणतीही फिल्म केला नाही. त्यामुळेच तिने पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर सल्लुमियाँसोबत रोमँस केला, तर तो रोमँस आणि तिची कॉमिक टायमिंग पून्हा एकदा पाहता येईल
   
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची नववी हिरोईन
   
   
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  एन्जेला जॉनसन –   
   
  एन्जेलाला तिचा पहिला ब्रेक सलमान खाननेच दिला. 'शेर खान'मधून दिसलेल्या ह्या हिरोइनला सलमानच्यासोबत अभिनय करायला मिळाला. तर तिच्या करीयरसाठी ही एक महत्वाची झेप असेल. 
   
   
  पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण असू शकेल, सलमान खानची दहावी हिरोईन
 • Salman Khan to romance 10 heroines in his next
  झरीन खान –
   
  झरीन खानचे करीयर घडवण्यात, तिला पहिला ब्रेक देण्यात सलमानचाच हात होता. सलमानशिवाय झरीन खानने फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला. तेव्हापासून पून्हा झरीनला सलमानसोबतच काम करण्याची इच्छा आहे.
   

Trending