आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या सलमानचे सोशल वर्क, आठ कोटी रुपये केले गरिबांवर खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नव्या ‘मेंटल’ चित्रपटासाठी लोकशनच्या शोधात असलेल्या सलमान खानला कळले की, महाराष्ट्रातील गावांमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि सरकारने पाठवलेल्या टँकरमधील बरेच पाणी वाया जाते. त्यामुळे त्याने काही तज्ज्ञांचा गट बनवला. तज्ज्ञांनी त्या भागात पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई असलेल्या अडीच हजार गावांत प्लास्टिकचे मोठे टँकर लावल्याने सरकारी टँकरच्या पाण्याबरोबरच पावसाचे पाणीदेखील त्यात साठवले जाऊ शकते, असा रिपोर्ट दिला. सलमान खानने महाराष्ट्र सरकारसह आपल्या एनजीओद्वारे अडीच हजार गावांत दोन हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टँकरची ऑर्डर दिली आहे. हा सर्व खर्च सध्या सलमानची एनजीओ करत आहे. तो ज्या कंपन्यांची जाहिरात करतो त्यांनीदेखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्या व्यवसाय प्रबंधक रेश्मा शेट्टीच्या देखरेखीखाली काम वेगाने सुरू आहे.

गेल्यावर्षी सलमान खानच्या ट्रस्टने जवळजवळ आठ कोटी रुपये गरिबांच्या उपचार आणि विद्यार्थ्यांच्या फी भरण्यात खर्च केले. चेकद्वारे पैसा सरळ रुग्णालयात किंवा संस्थेला पाठवण्यात आला. सलमानला काही वैयक्तिक त्रास नाही, तो आपल्या करिअरमध्ये शिखरावर आहे. मात्र जनतेचे दु:ख त्याला पाहवत नाही. आपल्या मर्यादित साधनांद्वारे जास्त लोकांची मदत न करू शकल्याचे त्याला दु:ख आहे.