आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इफ्तार पार्टीत शाहरुखने सलमानच्या वडिलांबरोबर केल्या भावूक करणा-या गोष्टी, जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या गळाभेटीनंतर दुसर्‍याच दिवशी सलीम खान साहेबांना एका पत्रकाराने विचारले की, ‘तुमच्या समोर तुमच्या मुलाने पुढाकार घेऊन शाहरुखसोबत पुन्हा मैत्री केली, या विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सलीम साहेब खूप गांभीर्याने पत्रकाराला म्हणाले की, ‘उत्तराखंडमध्ये भयानक पूर, बिहारमध्ये विषारी जेवणाने अनेक मुलांचा मृत्यू, गोव्यातूनदेखील अशाच बातम्या आल्या. काश्मीर वाद, देशात प्रचंड प्रमाणात राजकीय मोर्चाबंदी, टोमॅटोचे भाव वाढणे, माहागाई आणि भ्रष्टाचार आदी कारणाने दु:खी देशाला दोन नायकांच्या भेटीने फार बरे वाटत आहे. मात्र खाण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यात का? मुलांचे कुपोषण बंद झाले का?, राजकारणात स्थिरता आली का, किंवा संपूर्ण जगात शांती पसरली का? दोन नायकांच्या भेटीला माध्यमांचे राष्ट्रीय महत्त्व देणे दु:खाची बाब आहे. आपल्या देशात इतके गंभीर मुद्दे असताना दोन नायकांच्या भेटीला इतके महत्त्व देण्यावरून वाटते की, माध्यमात विचारवंत लोकांची खरंच कमतरता आहे का ? माझ्या मुलाने पुढाकार घेतला एवढीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.’