आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा शबाना झाली होती सरोगेट मदर, जाणून घ्या याच्याशी संबंधित फिल्मी कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दशकांपूर्वी शबाना आझमी आणि व्हिक्टर बॅनर्जी अभिनीत एका चित्रपटात शबानाने सरोगेट आईची भूमिका केली होती. व्हिक्टरची पत्नी गर्भधारण करण्यात अक्षम असते, म्हणून डॉक्टर पती-पत्नीचे बीज शबानाच्या गर्भाशयात बीजारोपण करतात. शबानाला या कामासाठी पुरेसे पैसे देण्यात येतात. मात्र बाळ जन्मल्यानंतर शबानाला बाळाचा मोह आवरत नाही आणि ती बाळ देण्यास नकार देते. कायदेशीररीत्या तिचा बाळावर काही अधिकार नसतो. कारण बीजारोपणाआधी तिने एक कायदेशीर करार केलेला असतो. मात्र कायदा आईच्या मायेला ओळखत नाही. या विषयावर अमेरिकेआधी चीनमध्ये ‘सरोगेट मदर’ नावाने चित्रपट बनवला होता.