आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या थापडेने दोन दिवस कोमात होती ही अॅक्ट्रेस, उध्वस्त झाले होते करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान दादा, वरती 'हिम्मत-ए-मर्दा' सिनेमादरम्यान ग्लॅमरस ललिता पवार, खाली ललिता पवार - Divya Marathi
भगवान दादा, वरती 'हिम्मत-ए-मर्दा' सिनेमादरम्यान ग्लॅमरस ललिता पवार, खाली ललिता पवार
मुंबई: भारतीय सिनेसृष्टीचे पहिले डान्सिंग आणि अॅक्शन स्टार भगवान दादा यांना बॉलिवूडचे भगवान म्हटले जाते. 'अलबेला' (1951) सिनेमाच्या 'शोला जो भडके' गाण्याने भगवान दादा लोकप्रिय झाले होते. 1919मध्ये एका टेक्सटाइल मिल कामगाराच्या घरी जन्मलेल्या भगवान दादांचे नाव भगवान आभाजी पालव होते. त्यांचा सुरुवातीपासूनच अभिनयाकडे कल होता. सुरुवातीच्या दिवसांत त्यांना मजुरीसुध्दा करावी लागली. परंतु सिनेमांचा मोह त्यांनी सोडला नाही.
हिंदी सिनेमांत आणली डान्सची वेगळी स्टाइल...
हिंदी सिनेमांत डान्सची वेगळी शैली आणणारे भगवान दादा 'अलबेला' कलाकार होते. त्यांच्यापासून अमितभ बच्चनसह आजच्या पिढीचे लोकसुध्दा प्रेरणा घेतात. परंतु कधीकाळी कलाकारांकडून आपल्या ईशा-यावर काम करून घेणारे भगवान दादांचे करिअर एकदा घसरले आणि नंतर कधीच वरती येऊ शकले नाही. अर्थित चणचण होती, पोट भरण्यासाठी छोट्या-छोट्या भूमिका कराव्या लागल्या. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत भगवान दादा यांच्याशी निगडीत रंजक गोष्टी...
भगवान दादांच्या थापडेने ललिता पवारचे करिअर झाले उध्वस्त...
भगवान दादांचा 1934मध्ये आलेला 'हिम्मत-ए-मर्दां' पहिला सिनेमा होता. त्यात ललिता पवार अभिनेत्री होत्या. त्याकाळात त्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेमाच्या सेटवर को-अॅक्टर भगवान दादा यांनी ललिता पवार यांच्या थोबाडीत मारली होती. त्यामुळे त्या दोन दिन कोमात होत्या. भगवान दादांनी ललिता इतक्या जोरात थोबाडीत मारली होती, की त्या फरशीवर कोसळल्या होत्या. ललिता यांच्या डाव्या डोळयाची रक्तवाहिनी फुटली, चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अ‍ॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्यांना मुख्य नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. त्या भूमिका पुढे ललिता यांना प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या भगवान दादाशी निगडीत रंजक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...