आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 Vintage Ads: रेखा, जॅकी, मिथून, सचिनसह या सेलेब्सच्या जाहिराती पाहिल्यात का तुम्ही!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आजच्या काळात जाहिरातींना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. इंटरनेट, टीव्ही, वृत्तपत्र, मोठमोठे होर्डिंग्स यांच्या माध्यमातून एखादे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी निर्माते कोट्यावधींचा खर्च करत असतात. या जाहिरातींसाठी आघाडीच्या अभिनेता-अभिनेत्रींना कोट्यवधींचे मानधन दिले जाते. इतकेच नाही तर आजच्या काळातील जाहिरातींना मादक रुप देण्याचा प्रयत्न केला जातोय. सेलिब्रिटांच्या सेक्सी इमेजचा वापर जाहिरातींमध्ये केला जातोय. अनेकदा क्रिएटिव्हिटीचा अभाव असल्याने अशा सूचक जाहिराती केल्या जात असल्याचे म्हटले जाते.

मात्र साधारण 70 ते 90 च्या दशकातील जाहिराती अशा नव्हत्या. एखाद्या कॅडबरीच्या जाहिरातीत आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मोकळेपणाने नाचणा-या मुलीला पाहण्यासाठी घरातले सगळे कौतुकाने टीव्हीसमोर यायचे. मात्र काळ बदलला आणि जाहिरातींचे स्वरुपसुद्धा. जुन्या काळातील जाहिराती लोक आवडीने पाहायचे. किंबहुना टीव्हीपेक्षा वृत्तपत्रांमध्ये झळकलेल्या प्रिंट जाहिरातींची चर्चा जास्त व्हायची. याच जुन्या आणि अत्यंत कल्पक जाहिराती लोकांना आज नॉस्टेल्जिक करतात.

या पॅकजेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नॉस्टेल्जिक करायचे ठरवले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला साधना, अशोक कुमार, सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, मिथून चक्रवर्ती, साधना, पद्मिनी कोल्हापुरे यांसह अनेक सेलिब्रिटींच्या अगदी जुन्या जाहिरातींची झलक बघायला मिळणार आहे. चला तर मग अगदी आपल्या वडील-आजोबांच्या काळात घेऊन जाणा-या या जुन्या जाहिरातींची खास झलक...