आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3rd Death Anniversary: Bollywood Stars At Dara Singh's Funeral

दारा सिंह यांच्या अंत्यसंस्कारात पोहोचले होते ऋषी कपूर-जरीनसह अनेक बॉलिवूड स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारा सिंह यांच्या अंत्यसंस्कारामध्ये पोहोचले होते ऋषी कपूर आणि झरीन खान
मुंबई: दारा सिंह यांनी केवळ पहिलवान म्हणूनच नव्हे तर अभिनयाच्या जगातसुध्दा आपली ओळख मागे सोडली. 19 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. सरदार वल्लभाई पटेल यांच्यासारखेच दारा सिंह यांना भारतीय सिनेसृष्टीचे 'लौह पुरूष' म्हणून ओळखले जात होते. याव्यतिरिक्त रुस्तम-ए-हिंद, रुस्तम-ए-पंजाब आणि हनुमानसारख्या नावांनीसुध्दा ते प्रसिध्द होते. एक पहिलवान आणि अभिनेत्यासह त्यांनी 'नानक दुखिया सब संसार' (1970) और 'सवा लाख से एक लडाऊं'(1976)सारख्या पंजाबी सिनेमांचे दिग्दर्शन करून दिग्दर्शक म्हणूनसुध्दा आपली नवीन ओळख निर्माण केली होती. त्यांनी 'भक्ती मे शक्ती' (1978) आणि 'करण' (1978)ला निर्मित केले.
किंगकांगसारखे जागतिक स्तरावरील प्रसिध्द पहिलवानाला मागे टाकून जगभरात आपली छाप सोडणारे दारा सिंह यांनी 12 जुलै 2012 रोजी जगाला अलविदा म्हटले. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा बॉलिवूडच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचे सावट पसरले होते. ऋषी कपूर, झरीन खान, फरदीन खान आणि रंधावासह अनेक बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा दारा सिंह यांच्या अंत्यसंस्कारात पोहोचलल्या बॉलिवूड स्टार्सची झलक...