आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: भरपावसात कलाकार-चाहत्यांनी साश्रुनयनांनी केले होते राजेश खन्नांना अलविदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
 
मुंबई - फिल्म इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना 18 जुलै रोजी पाचवी पुण्यतिथी होती. बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे राजेश खन्ना यांचे पाच वर्षांपूर्वी म्हणजे 18 जुलै 2012 रोजी मुंबईत निधन झाले होते. काका नावाने प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना यांनी 'कटी पतंग', 'आनंद', 'आन मिलो सजना', 'महबूब की मेंहदी', 'हाथी मेरे साथी', 'अंदाज' यांसारखे सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. काकांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. 1973मध्ये त्यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केले. त्यांना दोन मुली असून ट्विंकल आणि रिंकी ही त्यांची नावे आहेत. अक्षय कुमार राजेश खन्ना यांचा थोरला जावई आणि ट्विंकल खन्नाचा पती आहे.

1969मध्ये रिलीज झालेल्या 'आराधना' या सिनेमामुळे राजेश खन्ना यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. पुढील चार वर्षांत त्यांनी एकामागून एक 15 हिट सिनेमे दिले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये काकांनी सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स आपल्या नावी केले. तर तब्बल 17 वेळा या अवॉर्डसाठी त्यांना नामांकन मिळाले होते.

कलाकारांनी साश्रुनयनांनी केले होते अलविदा...
18 जुलै 2012 रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. वांद्रा स्थित त्यांच्या आशीर्वाद बंगल्यातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र मुसळधार पावसातसुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडकरांची रिघ लागली होती. अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, शाहरुख खान, ऋषी कपूर, सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी काकांना अखेरचा निरोप दिला होता. काकांच्या अंत्ययात्रेत त्यांचे चाहतेसुद्धा मोठ्या संख्येने सामील झाले होते.

पुढील स्लाईड्मध्ये पाहा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या अंत्ययात्रेत जमलेली गर्दी आणि सोबतच वाचा, त्यांच्या बॉलिवूडच्या या पहिल्या सुपरस्टारच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...