आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस घरातच पडून राहिला होता ललिता पवार यांचा मृतदेह, कुटुंबीय होते अनभिज्ञ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ललिता पवार)
मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार झाले, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये स्टारडम, प्रसिद्ध, पैसा आणि मानसन्मान प्राप्त केला. मात्र अखेरच्या काळात ते अज्ञातवासात निघून गेले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. आज त्या हयात असत्या तर 99 वर्षांच्या असत्या. सिल्व्हर स्क्रिनवर खाष्ट सासू आणि शिस्तप्रिय आईची भूमिका जीवंत करणा-या ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी येवला (नाशिक) येथे झाला होता. त्यांनी जवळजवळ सहाशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांचे पूर्ण नाव अंबा लक्ष्मण राव शागुन असे होते. बालकलाकाराच्या रुपात त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
आपल्या सिनेकरिअरमध्ये त्यांनी श्री 420, नौ दो ग्यारह, सुजाता, हम दोनों, प्रोफेसर, सौ दिन सास के, मिस्टर अँड मिसेस 55, आँखे यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. ऋषिकेश मुखर्जी यांनी ललिता पवार यांच्या प्रतिभेला नवीन दिशा दिली. त्यांनी 1959 मध्ये रिलीज झालेल्या 'अनाडी' या सिनेमात ललिता यांना मिसेस डिसूजाची भूमिका दिली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर ललिता यांनी मागे वळून पाहिले नाही. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन स्टारर 'आनंद' या सिनेमात त्यांनी साकारलेली मेटरनची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेत त्यांनी साकारलेल्या मंथराच्या भूमिकेसाठी दुस-या कोणत्याही अभिनेत्रीचा विचारच केला जाऊ शकत नाही.
1990 मध्ये ललिता यांना जबड्याचा कॅन्सर झाला. उपचारासाठी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. कॅन्सरमुळे दिवसेंदिवस त्यांचे वजन कमी होत गेले आणि त्यांची स्मरणशक्तीही कमजोर झाली. 26 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांच्या पतींनी त्यांना फोन केला, मात्र त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पुण्याच्या घरी दाखल झाले. येथे त्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला.
पोस्टमार्टममध्ये उघड झाले, की 24 फेब्रुवारी रोजीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच पडून राहिला होता. त्यांच्या निधनाबद्दल कुणालाच कळू शकले नव्हते. आज ललिता पवार आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांमधून त्या नेहमीच जीवंत राहतील.
Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही बॉलिवूड कलाकारांविषयी सांगत आहे, ज्यांना सुरुवातीला भरपूर स्टारडम, प्रसिद्धी-पैसा मिळाला, मात्र अखेरच्या काळात ते अज्ञातवासात राहिले, तर काही आजही हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आहेत...