आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93rd Birth Anniversary : राज कपूर यांना दिग्दर्शकाने मारले होते थोबडीत, रंजक आहे \'शोमॅन\'चा प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय सिनेसृष्टीतील राज कपूर हे एक असे नाव आहे, ज्यांच्या सिनेमांत मजा-मस्ती, प्रेम, हिंसा आणि समाजवाद असे सर्वकाही होते. राज कपूर यांच्यात महान अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची झलक दिसायची. सामान्य विचारांना पडद्यावर आणणारे अभिनेते राज कपूर यांची आज 93 वी जयंती आहे. अस्थमाचा अटॅक आल्याने 2 जून 1988 रोजी त्यांची निधन झाले होते.  

 

बालपणी अभिनेता नव्हे ट्रेन ड्रायव्हर बनण्याचे पाहिले होते स्वप्न...
14 डिसेंबर 1924 रोजी पेशावर (पाकिस्तान) येथे जन्मलेले राज यांचे बालपणी अभिनेता नव्हे तर ट्रेन ड्रायव्हर बनवण्याचे स्वप्न होते. त्यांचे पूर्ण नाव रणबीर राज कपूर असे होते. पृथ्वीराज कपूर आणि रामशरणी मेहरा यांचे ते मोठे सुपुत्र होते. त्यांना शम्मी आणि शशी हे दोन भाऊ आणि उर्मिला सियाल ही एक बहीण होती.


पुस्तके विकून खायचे चाट, पकोडे आणि केळी...
राज कपूर यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथे झाले. शिक्षणात त्यांना रस नव्हता. त्यामुळे त्यांनी दहावीचे शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. शालेय दिवसांत ते पुस्तके विकून चाट, पकोडे आणि केळी खायचे.


चुक केल्याने मिळाली होती शिक्षा...
राज कपूर यांनी वयाच्या 17 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याकाळातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याकेड ते क्लवॅपर बॉय म्हणून कामाला लागले. रणजीत मूवीटोन येथे त्यांनी फरशी पुसली आणि वजनसुद्धा उचललेले. याच काळात त्यांनी केदार शर्माकडून सिनेमातील बारकावेसुद्धा शिकले. एकदा राज कपूर यांच्या हातून चूक झाल्याने केदार शर्मा यांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती.


बालकलाकाराच्या रुपात अभिनयाला सुरुवात... 
1947 मध्ये त्यांचा पहिला सिनेमा रिलीज झाला. 'नीलकमल' हे त्यांच्या पहिल्या सिनेमाचे नाव होते आणि त्यामध्ये त्यांची नायिका होती मधुबाला. त्यापूर्वी राज कपूर यांनी ‘गौरी’, ‘इंकलाब’ आणि ‘हमारी बात’ या सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या रुपात काम केले होते. 1948 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी 'आग' या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात ते पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याच्या रुपात झळकले होते. 1950 मध्ये त्यांनी आर. के. स्टुडिओची स्थापना केली.

 

फिल्मोग्राफीत आहे अनेक अविस्मरणीय सिनेमांची नोंद... 
राज कपूर यांनी आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री 420’, ’चोरी-चोरी’, ’जिस देश में गंगा बहती है’, ‘जागते रहो’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ यांसारखे अनेक अविस्मरणीय सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. या सिनेमांत स्वतः राज कपूर यांनी स्वतः अभिनय केला होता. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती केली. या कालात आर. के बॅनरमध्ये 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेमरोग' आणि 'राम तेरी गंगा मैली' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली.


निधनापूर्वी 'हिना' सिनेमावर करत होते काम.. 
ही गोष्ट 2 मे 1988 ची आहे. राज कपूर यांना एका पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणा-या दादासाहेब फाळेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत होते, त्याचवेळी त्यांना अस्थमाचा अटॅक आला आणि ते खाली कोसळले. एक महिना जीवन आणि मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर 2 जून 1988 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी त्यांना जगाचा कायमचा निरोप घेतला. मृत्यू्पूर्वी ते 'हिना' या सिनेमावर काम करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले ऋषी आणि रणधीर कपूर यांनी हा सिनेमा पूर्ण केला.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, राज कपूर यांची अतिशय अतिशय दुर्मिळ छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...