आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE VIDEO: जेव्हा बाळासाहेबांसमोर कोसळले होते संजूला रडू, सोबत होते वडील सुनील दत्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेला 'संजू' चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा उल्लेख आहे. या घटनेमुळे संजय दत्तला तुरुंगवास भोगावा लागला होता. सुरुवातीलाच 1995 मध्ये या प्रकरणी संजूची तुरुंगात रवानगी झाली होती. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीने संजू बाहेर आला होता, असे म्हटले जाते. तुरुंगातून आल्यानंतर संजय दत्त, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार बाळासाहेबांना भेटायलाही गेले होते. राजेंद्र कुमार हेच सुनील दत्त यांना मदतीसाठी बाळासाहेबांकडे घेऊन गेले होते, असे सांगितले जाते.

 

तब्बल 23 वर्षे त्याच्यावर हा खटला चालला. याप्रकरणी संजयला पहिल्यांदा 19 एप्रिल 1993 रोजी एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. त्याला अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ही अटक झाली होती आणि 20 वर्षे हा खटला चलला. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला याप्रकरणी 5 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण तुरुंगातील त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच चांगल्या वर्तणुकीमुळे 25 फेब्रुवारी 2016 रोजी सोडण्यात आले होते.

 

काय होते हे संपूर्ण प्रकरण...
12 मार्च 1993 साली मुंबईत एकामागून एक 12 बॉम्ब ब्लास्ट झाले. या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला होता. पहिला ब्लास्ट 1 वाजून 29 मिनिटांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर झाला होता. त्यात 84 जण मृत्यूमुखी पडले होते. या स्फोटानंतर संजय दत्तच्या घरी अवैध शस्त्र सापडली होती. त्यामुळे 'टाडा' कायद्याखाली संजय दत्तला अटक होऊन, 1995 ला संजय दत्तची रवानगी जेलमध्ये झाली.

 

मॉरीशसहून परतताना एअरपोर्टवर झाली होती अटक...
बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या चौकशीत मुंबई पोलिसांना बॉलिवूडच्या लोकांचा यात सहभाग असल्याचे समजले. असे म्हटले जाते, की याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी निर्माता हनीफ कडावालाला बोलावले होते. हनीफने चौकशीमध्ये संजय दत्तच्या नावाचा उल्लेख केला होता. संजय 19 एप्रिल 1993 रोजी मॉरीशसहून मुंबईत दाखल झाला आणि पोलिसांनी त्याला विमानतळावरच अटक केली. असे म्हटले जाते, की संजयला अटक करण्यासाठी विमानतळावर 100 हून अधिक पोलिस तैनात होते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...