आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मुलांच्या पित्यासोबत केले होते या अॅक्ट्रेसने लग्न, सोसल्या होत्या 'ट्रिपल तलाक'च्या वेदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः एकाच वेळी तीन तलाक दिल्यास त्याला फौजदारी गुन्हा ठरवणारे बिल सरकार गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आले. बिलाला सर्वात आधी विरोध करणाऱ्यांमध्ये असदुद्दीन ओवेसींचा समावेश होता. तर कायदेमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, हे बिल महिलांचा सन्मान कायम राखला जावा यासाठी आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पक्षांनी या विधेयकावर एकमत दाखवण्याची विनंती केली. पंतप्रधान म्हणाले की, हे विधेयक महिलांशी होणारा भेदभाव नष्ट करणे, त्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळावा यासाठी आहे. या निर्णयाने ज्यांच्या पतींनी लहान-लहान गोष्टींवर टॉर्चर करून तलाक दिला होता अशा मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला तिहेरी तलाकच्या वेदना सोसाव्या लागल्या होत्या.  बॉलिवूडचे प्रसिद्ध डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर असलेले कमाल अमरोही यांनीही त्यांची तिसरी पत्नी अर्थातच मीना कुमारीला तीन वेळा तलाक म्हणत, तिच्यापासून वेगळे झाले होते. 


वयाच्या 19 व्या वर्षी केले होते मीना कुमारींनी लग्न...  
- ट्रॅजेडी क्वीन आणि भारतीय सिनेमांची सिंड्रेला म्हणून ओळखल्या जाणा-या मीना कुमारी यांनी वयाच्या 19 व्या वर्षी दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर कमाल अमरोही यांच्यासोबत लग्न केले होते.
- विशेष म्हणजे या लग्नाच्या वेळी कमाल अमरोही विवाहित आणि तीन मुलांचे पिता होते.


असे वादात अडकले मीना आणि कमाल यांचे लग्न..
- कमाल यांनी तीन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव बानो आणि दुस-या पत्नीचे नाव मेहमुदी असे होते. मेहमुदी यांना कमाल यांच्या तिस-या लग्नाबाबत समजल्यानंतर त्या अमरोहा (उत्तर प्रदेश) ला निघून गेल्या. 
- कमाल अमरोही यांना दुस-या लग्नपासून दोन मुले आणि एक मुलगी आहे. 
- एका मुलाखतीदरम्यान अमरोही यांची एकुलती एक मुलगी रुखसारने सांगितले होते, बाबा तिच्या अम्मीवर खूप प्रेम करायचे पण ती कधीही त्यांची प्रेयसी बनू शकली नाही. ती फक्त मीनाजी होती. 
- मी त्यावेळी 10 वर्षांची होते जेव्हा बाबाने मीना कुमारीशी लग्न केले. आम्ही अमरोहामध्ये होतो आणि बाबा मुंबईत. ते आम्हाला तिघांना (मुले शानदार आणि ताजदार) छोटी अम्मींना भेटायला घेऊन गेले होते. छोटी अम्मी आमच्याशी फार प्रेमाने बोलायची. 
- कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदारने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले होते, की एका रात्री अब्बा आम्हाला छोटी अम्मीला भेटायला घेऊन गेले. मी घाबरलेले होतो, की अम्मीला आम्ही आवडलो नाही तर. पण जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला जवळ बसवले आणि खूप वेळ गप्पा मारल्या.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या लग्न, तलाक आणि हलालाची कथा...

बातम्या आणखी आहेत...