आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: अनेक पिढ्यांसोबत केले होते जोहरा सहगल यांनी काम, लोक म्हणायचे 'बॉलिवूडची दादी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत डावीकडे - जोहरा सहगल, उजवीकडे वर - जोहरा सहगल, खाली - पती कामेश्वर नाथसोबत जोहरा सहगल) - Divya Marathi
(फोटोत डावीकडे - जोहरा सहगल, उजवीकडे वर - जोहरा सहगल, खाली - पती कामेश्वर नाथसोबत जोहरा सहगल)

मुंबईः भारतीय रंगभूमीच्या ज्येष्ठ अभिनेत्री, कोरिओग्राफर, नृत्यांगणा आणि सिल्व्हर स्क्रिनची आवडती आजी जोहरा सहगल आज आपल्यात असत्या तर त्यांनी वयाची 106 वर्षे पूर्ण केली असती. 50 हून अधिक सिनेमे आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन मोहून घेणा-या जोहरा सहगल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी यूपीतील सहारनपूर येथे झाला होता. 

 

मुमताज-उल्लाख खान होते खरे नाव 
जोहरा सहगल यांचे खरे नाव बेगम मुमताजुल्ला खान होते. मात्र डान्सर आणि परफॉर्मर कामेश्वरनाथ सहगलसोबत लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव जोहरा सहगल झाले. 14 ऑगस्ट 1942 रोजी कामेश्वरनाथ यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. अल्मोडा येथे उद्य शंकर शाळेत त्यांची कामेश्वरनाथ यांच्यासोबत पहिली भेट झाली होती. लग्नानंतर त्यांनी मुलगी किरण आणि मुलगा पवन यांना जन्म दिला. दुर्दैवाने ऐन तारुण्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर जोहरा यांनी समर्थपणे आपल्या मुलांचे पालनपोषण केले. 

 

उदय शंकरसोबत दिला होता पहिला परफॉर्मन्स 
जोहरा सहगल यांनी आपला पहिला पब्लिक परफॉर्मन्स 1935 मध्ये उदय शंकर यांच्यासोबत दिला होता. तर त्यांना सिनेसृष्टीतील पहिली संधी के.ए.अब्बास यांनी 1946 मध्ये दिली होती. सिनेमाचे नाव होते 'धरती के लाल'. त्यांनी आपल्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये नीचा नगर, अफसर, दिल से, कल हो न हो, वीर-जारा आणि चीनी या सिनेमांमध्ये काम केले होते. 

 

प्रत्येक पीढीतील कलाकारांसोबत केले काम... 
उल्लेखनीय बाब म्हणजे जोहरा सहगल यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक पीढीतील कलाकारांसोबत काम केले आहे. यामध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते त्यांचे पणतू रणबीर कपूरच्या नावाचा समावेश आहे. थिएटरवर प्रेम असलेल्या जोहर यांनी पृथ्वीराज कपूर थिएटरमध्ये जवळपास 14 वर्षे काम केले. 'तंदूरी नाइट्स'ला त्यांची सर्वात उत्कृष्ट मालिका मानले जाते. 2012 मध्ये त्यांची बायोग्राफी  "Zohra Sehgal: Fatty" वाचकांच्या भेटीला आली. ही बायोग्राफी त्यांची लेक किरण सहगल यांनी लिहिली होती. त्यांना 1998मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10 जुलै 2014 रोजी वयाच्या 102 व्या वर्षी जोहरा सहगल यांनी या जगाचा निरोप घेतला. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा जोहरा सहगल यांची तारुण्यापासून ते वृद्धापळापर्यंतची आठवणीतील छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...