आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे बॉलिवूडची पहिली अॅक्ट्रेस, 85 वर्षांपूर्वी दिला होता तब्बल 4 मिनिटांचा किसींग सीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः भारतीय सिनेसृष्टीची पहिली अभिनेत्री म्हणून देविका रानी यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म 30 मार्च 1908 रोजी विशाखापट्टनममध्ये झाला होता. देविका यांचे बालपण यूकेमध्ये गेले. तिथे त्यांनी बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले होते. देविका जशा बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री होत्या तसेच त्यांचे वडील कर्नल मन्मथा नाथ चौधरी मद्रास प्रेसिडेंसीचे पहिले भारतीय सर्जन होते. सिगारेट आणि दारूच्या आहारी गेल्याने आणि शॉर्ट टेम्पर असल्याने देविका यांना 'ड्रॅगल लेडी' म्हणून ओळखले जात होते. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री असलेल्या देविका यांच्या खासगी आयुष्याविषयी...

 

सिनेसृष्टीतील पदार्पण-
देविका यांनी 1933मध्ये हिमांशु राय यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या 'कर्मा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात हिमांशु मुख्य भूमिकेत होते. 'कर्मा' एका भारतीयाने बनवलेला पहिला इंग्रजी टॉकी होता. एवढेच नव्हे, भारतातील पहिल्याच सिनेमात किसींग सीन देण्यात आला होता. विशेष म्हणजे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांना देविका रानी यांनीच फिल्म इंडस्ट्रीत आणले होते. 

 

पुढे वाचा, किसिंग सीनचा विक्रम आजही आहे अबाधित....

देविका राणींचे हिमांशू रायसोबत लग्न... 
हिमांशु राय यांच्या निधनानंतर बघितला होता संघर्षाचा काळ... यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...