आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: असा असायचा RK स्टुडिओतील धुळवडीचा थाट, रंगात न्हाऊन निघायचे तारे-तारका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : आरके स्टूडिओच्या होळीत जितेन्द्र, अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रा, हौदेत शम्मी कपूर, बाहेर उभे राज कपूर, रणधीर, ऋषी आणि अन्य) - Divya Marathi
(फाइल फोटो : आरके स्टूडिओच्या होळीत जितेन्द्र, अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रा, हौदेत शम्मी कपूर, बाहेर उभे राज कपूर, रणधीर, ऋषी आणि अन्य)

मुंबईः बॉलिवूड स्टार्ससाठी होळीचा सण हा अविस्मरणीय असतो. फिल्मी स्टार्स आपापल्या अंदाजात रंगाचा उत्सव साजरा करतात. बॉलिवूडमध्ये आर.के स्टुडिओची होळी हटके आणि मजेशीर असते. आरकेच्या होळीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. आर.के. स्टुडिओतील प्रत्येक मोठ्या आणि छोट्या व्यक्तीसोबत ते आनंदाने धुळवड खेळायचे. त्यांच्यानंतर मुलगा राजकपूर आणि त्यांच्या मुलांनी ही परंपरा कायम ठेवली.


आर.के स्टुडिओत होळी सेलिबेट करण्यासाठी एका मोठ्या हौदेत भरपूर पाणी आणि त्यात रंग मिसळले जायचे. येथे येणा-या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत रंगाने भरलेल्या हौदेत डुबकी मारुन केले जायचे. जे हौदेत डुबकी मारण्यास नकार द्यायचे त्यांना बळजबरीने रंगवले जायचे. त्यानंतर सर्वजण ताल धरुन या रंगांच्या उत्सवाची मजा लुटायचे.


आर. के स्टुडिओच्या ऐतिहासिक होळीत नर्गिस, वैजयंती माला, हेमामालिनी, धर्मेन्द्र, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, जितेंद्र, दारा सिंह, राकेश रोशन, प्राण, प्रेमनाथ, मिथुन, राजेश खन्ना, अमिताभ, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी, रेखा, श्रीदेवी, झीनत अमानसह अनेक कलाकारांनी येथे होळीची मजा अनुभवली आहे. राजकपूर यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी एकता कपूरची कंपनी बालाजी टेलिफिल्म्सच्या सहकार्याने स्टार प्लसच्या कलाकारांनी येथे होळी खेळली होती.


पुढे पाहा, आर. के. स्टुडिओतील ऐतिहासिक होळीची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...