आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनालीसाठी Crazy होता हा पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणाला होता, नकार दिला तर किडनॅप करेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याचे समोर आले आहे. सोनालीनेच ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. सोनाली आपला पती गोल्डी बहलसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोनालीच्या लव्ह लाइफवर बोलावयाचे झाल्यास ती नेहमीच चर्चेत होती. एकेकाळी पाकिस्तानचा स्टार बॉलर राहिलेला शोएब अख्तर तिच्यासाठी क्रेझी झाला होता. एका मुलाखतीमध्ये गंमत करताना त्याने सोनाली बेंद्रेवर आपले प्रेम व्यक्त केले होते. सोनालीने होकार दिला तर ठीक, नाही तर तिला किडनॅप करून घेऊन जाईन असे शोएब म्हणाला होता. तिचे नाव अभिनेता सुनील शेट्टीसोबत देखील जोडले गेले. दोघांनी 'सपूत', 'टक्कर' सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले. परंतु, नंतर ते दूर झाले. 


पहिल्या नजरेत घायाळ झाले होते गोल्डी
- पंजाबी तरुण गोल्डी बहल आणि मराठी मुलगी सोनाली यांची लव्ह स्टोरी काही वेगळी आहे. दोघांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 
- प्रोड्यूसर गोल्डींनी सोनाली पहिल्यांदा 1994 मध्ये चित्रपट 'नाराज'च्या सेटवर पाहिले होते. पहिल्या नजरेतच गोल्डी घायाळ झाले होते. त्यांची बहिण सृष्टी आर्य सोनालीची मैत्रिण होती. तिनेच या दोघांची पहिली भेट करून दिली. पहिल्या भेटीतच गोल्डींनी सोनाली अतिशय हळुवार खाते त्यावर काही कॉमेंट केली. त्यावर सोनाली नाराज झाली होती. 

 

अभिषेकने दिले धाडस
- त्यावेळी सोनाली बेंद्रे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मेजर साब चित्रपटात काम करत होती. सेटवर जुनिअर बच्चन अभिषेक सुद्धा येत होता. त्यानंतर अभिषेक आणि गोल्डी बहल यांच्यात मैत्री झाली. अभिषेकची भेट घेण्याच्या बहाण्याने त्यांनी सेटवर वारंवार जाण्यास सुरुवात केली. 
- यानंतर सोनाली, अभिषेक आणि गोल्डी एकत्रित भेटायला लागले. सोनालीचा नेक्स्ट चित्रपट अंगारे गोल्डी यांनीच प्रोड्युस केला होता. याच चित्रपटाची पार्टी सुरू असताना अभिषेकने गोल्डींना धाडस दिला. गोल्डींनी सोनालीला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने होकार दिला. 
- सोनालीने एका मुलाखतीमध्ये शूटिंग सेटच्या आठवणी ताज्या केल्या होत्या. "ते (गोल्डी) सेटवर येऊन माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. ते क्षण अतिशय क्यूट होते. आमची मैत्री झाली आणि 5 वर्षे एकमेकांना डेट केले." 12 नोव्हेंबर 2002 मध्ये दोघांनी विवाह केला. ऑगस्ट 2005 मध्ये सोनालीने मुलगा रणवीरला जन्म दिला. 


1994 मध्ये केली करिअरला सुरुवात
- सोनाली बेंद्रेने 1994 मध्ये 'आग' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने गोविंदासोबत काम केले. याच वर्षी तिला न्यू फेस ऑफ द ईयरचे फिल्मफेअर मिळाले होते. 
- सोनालीने 1990 ते 2000 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले. यात 'दिलजले' (1996), 'तराजू' (1997), 'मेजर साहब' (1998), 'हम साथ-साथ हैं' (1999), 'हमारा दिल आपके पास है' (2000), 'तेरा मेरा साथ रहे' (2001) अशा चित्रपटांचा समावेश आहे. ती शेवटची 2013 मध्ये आलेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' मध्ये दिसून आली होती. त्यामध्ये तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 
- सोनाली बेंद्रे बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे जिने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर अशा तिन्ही खानसोबत स्क्रीन शेअर केले. सोनालीने सलमानसोबत 'हम साथ-साथ हैं', आमिरसोबत 'सरफरोश' आणि शाहरुखोबत 'इंग्लिश बाबू देसी मेम' आणि 'डुप्लीकेट' यात काम केले आहे. तिने टीव्ही सीरियल 'अजीब दास्तां है ये' मध्ये सुद्धा काम केले.

बातम्या आणखी आहेत...