आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pablo Bartholomew Pulls Put Incredible Photos Of Anupam Kher, AlokNath During Their College Days

भूतकाळात डोकावताना... बॉलिवूड सेलिब्रिटींचे हे 10 दुर्मिळ Photos आहेत आठवणीतील ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मागे वळून पाहताना बॉलिवूडची आजची रंगीत दुनियासुद्धा ब्लॅक अँड व्हाइट दिसते. गतकाळात या रंगीत दुनियेने अनेक चढउतार पाहिले. ते काही क्षण छायाचित्रांमध्ये कैद झाले, तर काही केवळ आठवणीतच राहिले. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींची 60 ते 70 च्या दशकात कैद झालेली खास 10 छायाचित्रे दाखवत आहोत. ही सर्व छायाचित्रे पाब्लो बर्थलमय यांनी क्लिक केली आहेत. पाब्लो हे मीडिया आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असून व्यवसायाने प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. त्यांनी आलोकनाथ, अनुपम खेर, स्मिता पाटील यांच्यासह अनेक कलाकारांचे खास क्षण आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहेत. ही छायाचित्रे नक्कीच बॉलिवूडसाठी आठवणीतील ठेवा आहे.


वरील छायाचित्रातील अभिनेत्याला ओळखलंत का?
वरील छायाचित्रात दिसणा-या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का... काय म्हणता नाही... चला आम्ही तुम्हाला सांगतो. हे आहेत बॉलिवूडचे फेमस बाबुजी. होय, अभिनेते आलोकनाथ. त्यांच्यासोबत छायाचित्रात दिसणारी ही आहे, त्यांची सहकलाकार मोना चावला. 1976 साली क्लिक झालेले हे छायाचित्र दिल्लीतील आहे. फैजल कलकाजी यांच्या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान आलोकनाथ आणि मोना चावला यांचे हे छायाचित्र पाब्लो यांनी क्लिक केले होते. या छायाचित्रात आलोकनाथ यांना ओळखणे तसे कठीणच आहे, नाही का.


पुढील स्लाईड्समध्ये पाहा पाब्लो बर्थलमय यांच्या कॅमे-यात कैद झालेले बॉलिवूड सेलिब्रिटींचे दुर्मिळ क्षण...

बातम्या आणखी आहेत...