आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवानंदच्या पुतण्यांनी केली होती या प्रसिद्ध अॅक्ट्रे्सची हत्या, अंगावर शहारा आणते ही मर्डर मिस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

60 आणि 70च्या दशकात लंडनहून भारतात आलेल्या एका अतिशय देखण्या तरुणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण ठेवले आणि आपल्या अभिनयाच्या बळावर येथे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. या अभिनेत्रीचे नाव होते प्रिया राजवंश. या अभिनेत्रीची कहाणी एखाद्या ट्रॅजिक फिल्मपेक्षा कमी नाहीये. प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे भाऊ चेतन आनंद यांची प्रिया दुसरी पत्नी होती. 

 

या पॅकेजमधून जाणून घेऊयात चेतन आनंद यांची प्रिया कशी झाली दुसरी पत्नी, का तिच्या सावत्र मुलांनी म्हणजेच देवानंद यांच्या पुतण्यांनी केली तिची हत्या आणि या हत्याकांडाविषयी बरेच काही...  

 

- प्रियाचा जन्म शिमल्यात झाला. तिचे बालपणीचे नाव वीरा होता. शालेय शिक्षण झाल्यानतंर पुढच्या शिक्षणासाठी प्रिया लंडनमध्ये गेली. मात्र तिच्या नशीबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. एकेदिवशी एका फोटोग्राफरने 22 वर्षीय प्रियाची छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे त्याकाळातील प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या बघण्यात आली. 'हकीकत' या सिनेमासाठी चेतन आनंद नव्या चेह-याच्या शोधात होते. प्रियाचे देखणे रुप बघून त्यांनी तिला आपल्या सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला. 

 

- अशाप्रकारे प्रियाला बॉलिवूडमधून सिनेमाची पहिली ऑफर मिळाली आणि ती चेतन आनंद यांच्या सिनेमाची हीरोईन बनली. चेतन आनंद हे अभिनेते देव आनंद आणि विजय आनंद यांचे बंधू. प्रिया त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा चेतन विवाहित होते. याच काळात रिल लाईफसोबतच खासगी आयुष्यातसुद्धा प्रिया आणि चेतन आनंद यांच्यात जवळीक निर्माण झाली. 

 

- चेतन आनंद आणि प्रिया यांच्या वयात तब्बल 22 वर्षांचे होते. प्रिया त्यांच्यापेक्षा खूप लहान होती. चेतन आनंद यांच्याच सिनेमात काम करण्याचा प्रियाने निर्णय घेतला होता. चेतन आनंदसुद्धा प्रियाशिवाय दुस-या अभिनेत्रीला सिनेमात घेत नव्हते. प्रिया चेतन यांना स्क्रिप्टिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या कामातसुद्धा मदत करायची. यावरुन लोकांचा अनेकदा चेतन यांचा वाददेखील व्हायचा. एक काळ असा आला, जेव्हा प्रिया आणि चेतन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून लागले होते. 1964 ते 1986 अशी सलग बावीस वर्षे हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करणा-या प्रियाला लोक चेतन आनंद यांच्या दुस-या पत्नीच्या रुपात बघू लागले होते.

 

- 'गाइड' या सिनेमातसुद्धा चेतन प्रियालाच कास्ट करण्याच्या विचारात होते. भाऊ देवानंदसोबत वहिदा रहमान नव्हे तर प्रिया झळकावी, अशी त्यांची इच्छा होती. पण देव आनंद यांनी प्रिया ऐवजी वहिदा रहमानला सिनेमासाठी साइन केले होते.  

 

पुढे वाचा, या मर्डर मिस्ट्रीविषयी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...