आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93rd Birth Anniversary : दिलीप कुमारांसोबत होती राज कपूर यांची घनिष्ठ मैत्री, बघा विंटेज फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिवंगत राज कपूर हे दिलीप कुमार यांचे जिवलग मित्र होते. खरं तर दिलीप साहेबांनी राज कपूर यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. राज कपूर यांनी 1935मध्ये 'इंकबाल' सिनेमातून वयाच्या 10व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिलीप कुमार 1944मध्ये 'ज्वारभाटा'मधून अभिनय क्षेत्रात आले. दिलीप कुमार यांच्या लग्नात राज कपूर यांनी उपस्थिती लावली होती. 

 

दिलीप कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की फिल्मी जगात येण्यासाठी राज कपूर यांनी त्यांना प्रेरित केले होते. या मुलाखतीत दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्यासोबतच्या मैत्रीविषयी म्हणाले होते, 'कॉलेजच्या दिवसांत माझी आणि राजची मैत्री झाली होती. आम्ही दोघे एकाच शहरात जन्मलेलो आहोत. कॉलेजच्या दिवसांत आम्ही सॉकर खेळायचो. त्यावेळी राज म्हणाले होते, तू सिनेमांत ये. परंतु मी त्यांना नकार दिला होता आणि म्हणालो, 'तू जा तुझे अब्बासुध्दा सिनेमांत आहेत, तुसुध्दा जा.'

 

दिलीप साहेबांनी पुढे सांगितले होते, की त्यानंतर मी राज कपूर यांना पहिल्यांदा एका स्टुडिओमध्ये भेटलो तेव्हा त्यांनी मला म्हणाले, 'पाहिलंस मी तुला म्हणालो होतो ना तू सिनेमांत येशील.' मात्र मी त्यावेळी दुस-या कामासाठी तिथे गेलो होतो. मी जेव्हा सिनेमांत नव्हतो आणि सिनेमा जगात आलो तेव्हाही ते माझ्यासोबत होते. आमचे नाते खूप चांगले होते.'

इंटरनेटवर राज कपूर आणि दिलीप कुमार यांची काही छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यामध्ये दोघांची मैत्री झळकते. काही फोटोंमधून दिलीप साहेब राज कपूर यांचे गालगुच्चे घेताना दिसत आहेत. 


दिवंगत राज कपूर साहेबांच्या 93 व्या जयंतीच्या निमित्ताने छायाचित्रांच्या माध्यमातून बघुयात त्यांची आणि दिलीप कुमार यांची मैत्री... 

बातम्या आणखी आहेत...