आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ...म्हणून या अॅक्टरला राजेंद्र कुमारांनी विकला होता आपला लकी बंगला, रडले होते ढसाढसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ज्युबली कुमार या नावाने ओळखले जाणारे अभिनेते राजेंद्र कुमार यांची आज 89 वी जयंती आहे. राजेंद्र कुमार यांनी सुमारे चार दशकं आपल्या अभिनयाने गाजवली. साठच्या दशकातील ते सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जायचे. 70च्या दशकात मात्र त्यांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते. आज त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांच्याविषयी बरंच काही... 

 

सोडावा लागला होता लकी बंगला..
70 च्या दशकात राजेंद्र कुमार यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यावेळी त्यांना त्यांचा आवडता बंगला 'डिंपल' विकावा लागला होता. 1960 साली राजेंद्र कुमार यांनी हा बंगला 60 हजार रुपयात भारत भूषण यांच्याकडून विकत घेतला होता. याचे रिनोवेशन करत त्यांनी बंगल्याचे नाव मुलीच्या नावावरुन डिंपल असे ठेवले. या बंगल्यात येताच त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली. हा त्यांचा लकी बंगला मानला जायचा. जेव्हा  राजेंद्र कुमार हा बंगला विकत आहेत असे राजेश खन्ना यांना समजले त्यांनी लगेचच तो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राजेश खन्ना यांनी 3.5 लाख रुपयात बंगला खरेदी केला. त्यानंतर राजेंद्र कुमार त्यांच्या पाली हिलमधील बंगल्यात राहायला गेले. ज्यादिवशी त्यांना हा बंगला सोडून जायचे होते तेव्हा ते ढसाढसा रडले होते. 


पुढे वाचा, सायरा बानोसोबत होते अफेअर... 

बातम्या आणखी आहेत...