आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: पहिल्या सुपरस्टारच्या पडद्यामागच्या खास गोष्टी, टिकले नाहीत अफेअर आणि लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार असलेले राजेश खन्ना यांचे आज सहावे पुण्यस्मरण आहे. 18 जुलै 2012 रोजी दीर्घ आजाराने राजेश खन्ना यांनी या जगाला कायमचे अलविदा केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खन्ना गावात झाला होता. त्यांचे खरे नाव जतिन कुमार होते. त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने दत्तक घेतले होते. राजेश खन्ना यांचे बालपण ऐश्वर्यात गेले. 1965 साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने एका टॅलेंट हंटचे आयोजन केले होते. या टॅलेंट हंटमधून हिरोची निवड करण्यात येणार होती. दहा हजार मुलांमधुन आठ मुलांची निवड करण्यात आली होती. या आठ मुलांमध्ये राजेश खन्ना यांचा समावेश होता. अखेरीस राजेश खन्ना या टॅलेंट हंटचे विजेते ठरले.


आज राजेश खन्ना यांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उजाळा देऊयात त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टींना...  

 

खरे नाव होते जतिन खन्ना... 
- राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. आपल्या काकांच्या म्हणण्यावर त्यांनी आपले नाव बदलून राजेश खन्ना केले. 1969 ते 1975 या कालावधीत राजेश यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. याकाळात अनेक आईवडिलांनी आपल्या मुलाचे नाव राजेश ठेवले होते.

 

जितेंद्र होते जवळचे मित्र... 
- राजेश खन्ना यांचे शालेय शिक्षण गिरगावातील सेंट सेबेस्टियन गोवन हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच राजेश खन्ना यांना अभिनयात रूची होती. त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. अभिनेता जितेंद्र राजेश खन्ना यांचे जवळचे मित्र होते. दोघेही एकाच शाळेत शिकले. शिवाय मुंबईतील किशनचंद चेल्लाराम कॉलेजमध्येही त्यांनी एकत्र प्रवेश घेतला होता. असे म्हटले जाते, की जितेंद्र जेव्हा पहिल्यांदा ऑडीशन द्यायला गेले होते, तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांना अभिनयाच्या टीप्स दिल्या होत्या.
 

हा होता पहिला चित्रपट... 
- राजेश खन्ना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी जेव्हा स्ट्रगलला सुरुवात केली तेव्हा ते निर्मात्यांकडे आपल्या एमजी स्पोर्ट या कारने जात होते. त्याकाळात केवळ मोठमोठ्या स्टार्सकडेच ही गाडी होती. राजेश खन्ना यांना पहिला ब्रेक 1966 साली 'आखिरी खत' या सिनेमाद्वारे मिळाला. या सिनेमात त्यांची को-स्टार इंद्राणी मुखर्जी होती. त्यानंतर आनंद आणि 'नमकहराम' या सिनेमांनी राजेश खन्ना बॉलिवूडचे बादशहा बनले. राजेश खन्ना यांचे सिनेमात असणे म्हणजे यशाची हमखास हमी होती. आपल्या दीड दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी एकाहून एक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले.

 

आपल्या तत्त्वांवर करायचे चित्रपटांत काम... 
- राजेश खन्ना यांना रोमॅण्टीक हिरोच्या रुपात पसंत केले जात होते. त्यांच्या डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या लकबीचे लोक दिवाने होते. काहींना त्यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले, तर काहींना त्यांच्या फोटोबरोबरच लग्न केले. काही तरुणींनी आपल्या हातावर राजेश यांचे नाव गोंदवून घेतले. राजेश खन्ना यांना डोळ्यासमोर ठेऊन त्याकाळी अनेक सिनेमांच्या कथा लिहिल्या गेल्या. काका कोणत्याही सिनेमात आपल्या तत्त्वांवर काम करत होते. असे म्हटले जाते, की राजेश खन्ना जेव्हा सिनेमाच्या सेटवर जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र असायचे. राजेश खन्ना यांचा शॉट ओके झाल्यानंतर त्यांचे मित्र वाह वाह करायचे.

 

चित्रपटांनी प्रस्थापित केले अनेक रेकॉर्ड 
- राजेश खन्ना यांच्या अनेक सिनेमांनी रेकॉर्ड प्रस्थापित केले. त्यांचा सिनेमा कदाचितच हिट झाला नसावा. 'हाथी मेरे साथी' हा सिनेमा मोठ्यांबरोबरच लहान मुलांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाला होता.


पुढे वाचा, कशी होती राजेश खन्ना यांची लव्ह आणि मॅरीड लाइफ आणि यासह बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...