आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Anni: आईमुळे खराब झाला होता पंचम दांचा एक डोळा, लग्नाला होता आईचा विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये नाविन्यपूर्ण संगीताने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे महान संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच पंचम दा यांची आज 79 वी जयंती आहे. 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे भारतीय चित्रपटसृष्टीतील या जादूगार संगीतकाराचा जन्म झाला होता. पंचम दा यांनी आशा भोसले यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. आशा भोसले यांचेही हे दुसरे लग्न होते. आशा भोसले पंचम दांपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठ्या होत्या. दोघांची लव्ह स्टोरी अतिशय इंट्रेस्टिंग आहे. दोघांची पहिली भेट ही संगीतकार-गायिकेची नव्हे तर फॅन आणि एका सेलिब्रिटीच्या रुपातील होती. 1956 साली दोघांची पहिली भेट झाली होती.

 

अशी होती पहिली भेट...

पंचम दा आशा भोसले यांचे फॅन होते. पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नव्हते. पंचम दांनी फक्त आशा भोसले यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला होता. त्याकाळात आशा भोसले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तर आरडी बर्मन प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचा टीनएज मुलगा होता. या भेटीनंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1966 साली आरडी बर्मन यांनी तीसरी मंजिल या चित्रपटातील गाणी गाण्यासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला होता. 'ओ हसीना जुल्फों वाली..' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात दोघांची मैत्री झाली.

 

दोघांचेही पहिले लग्न ठरले होते अपयशी... 
- 'तीसरी मंजिल' या चित्रपटानंतर आशा यांनी पंचम दांसाठी गाणे सुरु केले. आरडी बर्मन ज्या चित्रपटांचे संगीत देत, त्या चित्रपटांमध्ये आशा भोसले यांचे गाणे नक्की असायचे. 70 च्या दशकात दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. हा तो काळ होता, जेव्हा दोघांचेही पहिले लग्न अपयशी ठरले होते. आरडी बर्मन त्यांची पहिली पत्नी रीता पटेलपासून विभक्त झाले होते. तर आशा भोसले यादेखील त्यांचे पहिले पती गणपतराव भोसलेंपासून वेगळ्या झाल्या होत्या. दोघेही एकटे होते, हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ आले. 

 

आरडी बर्मन यांच्या आईचा होता लग्नाला विरोध... 
- आर.डी बर्मन यांनी आशा यांना लग्नाची मागणी घालताना म्हटले होते, की तुच फक्त माझा सूर समजू शकते. मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलोय. आशा यांना आरडींच्या बोलण्याचा उद्देश कळला आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. ही गोष्ट स्वतः आशा यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.  पण या लग्नाला आरडी यांच्या मातोश्रींचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी लग्नासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा केली.

 

आरडींच्या मातोश्री होत्या मनोरुग्ण.. 
- याचकाळात आरडी बर्मन यांचे वडील सचिनदेव बर्मन यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने आरडींच्या मातोश्री मीरा मनोरुग्ण झाल्या. त्यांची स्मृती गेली होती. त्या स्वतःच्या मुलालासुद्धा ओळखत नव्हत्या. एक वेळ अशी आली, जेव्हा आईच्या प्रकृतीत सुधार होणार नसल्याचे आरडींना कळले आणि त्यांनी 1980 मध्ये आशा यांच्यासोबत लग्न केले.

 

आईमुळे खराब झाला होता आरडींचा एक डोळा...
- आरडी बर्मन यांच्या मातोश्री मनोरुग्ण होत्या. त्या अवस्थेत त्यांनी आरडी बर्मन यांच्यावर एका धारदार वस्तूने हल्ला केला होता. त्यात आरडी बर्मन यांचा एक डोळा खराब झाला होता. 

 

अपयशाचा काळ...
80 च्या दशकात पंचम दांचे संगीत हिट होत नव्हते. त्यामुळे ते चिंतेत राहू लागले होते. दीर्घ काळानंतर 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना विधू विनोद चोप्रांच्या '1942 अ लव स्टोरी' या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट झाली होती. पण हे यश बघण्यासाठी आरडी बर्मन या जगात नव्हते. 1994 साली वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले होते. 

 

अशा भोसले आणि आरडीबर्मन यांनी या चित्रपटासांठी केले एकत्र काम...
आरडी बर्मन संगीतकार असलेल्या 'ओ मेरे सोना ना रे..', 'चुरा लिया है जो दिल को..', 'तुम साथ हो जब अपने..', 'दम मारो दम..', 'दो लफ्जो की है दिल की..', 'कह दूं तुम्हें..', 'सुन सुन दीदी तेरे लिए..' या गाण्यांना आशा भोसले यांनी स्वरसाज चढवला. 

बातम्या आणखी आहेत...