आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rememberance : अशी स्मिता पाटील आता होणे नाही.., जगाचा निरोप घेऊन लोटली 31 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अर्धसत्‍य', 'शक्‍ती', 'बाजार', 'उंबरठा', 'जैत रे जैत', 'मिर्च मसाला' या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने चित्रपटसृष्‍टीत आपला दरारा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून तिने अभिनयाचे धडे घेतले. अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर स्मिता विवाहबंधनात अडकली होती.


17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिताचा जन्म झाला होता. तर 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिताने या जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटीलची 31 वी पुण्यतिथी. स्मिताच्या निधनानंतर तिचे जवळपास 14 चित्रपट प्रदर्शित झाले होते.


दोन दशकं आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणा-या स्मिताच्या आयुष्याला वादाचीही किनार आहे. स्मितावर संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्मिताच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या स्मिताविषयी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...