आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Richa Sharma Madhuri Dixit Love Triangle पत्नीच्या कानावर आली होती संजय माधुरीच्या लग्नाची गोष्ट, उपचार सोडून आली होती मुंबईत

पत्नीच्या कानावर आली होती संजय-माधुरीच्या लग्नाची गोष्ट, उपचार सोडून आली होती मुंबईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट येत्या 29 जून रोजी रिलीज होतोय.

- या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतोय.

 

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट येत्या 29 जून रोजी रिलीज होतोय. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूर वठवतोय. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटात संजय दत्तच्या सुमारे 350 गर्लफ्रेंड असल्याचा उल्लेख केला आहे.  यापैकीच एक होती ऋचा शर्मा, जी नंतर संजय दत्तची पहिली पत्नी झाली. संजय आणि ऋचा यांचे 1987 साली लग्न झाले होते. पण लग्नाच्या दीड वर्षांतच ऋचाला ब्रेन ट्युमर असल्याचे समोर आले होते. उपचारांसाठी ऋचा अमेरिकेत गेली होती. तर संजय भारतात त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात बिझी होता. दरम्यान 90च्या दशकात संजय आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंतच्या गोष्टी पसरल्या. ही गोष्ट जेव्हा ऋचाच्या कानावरही पडली. संजयच्या लग्नाबद्दल समजताच ती आपले लग्न वाचवण्यासाठी उपचार अर्धवट सोडून भारतात परतली होती. 


संजयने दिले नव्हते ऋचाला महत्त्व...
- ऋचा जेव्हा उपचार अर्धवट सोडून अमेरिकेहून मुंबईत परतली होती, तेव्हा संजयने तिच्याकडे पाठ फिरवली होती. इतकेच नाही तर आजारी पत्नी आणि मुलगी त्रिशालाला घेण्यासाठी तो एअरपोर्टवरही गेला नव्हता. याचा उल्लेख  यासिर उस्मान यांच्या 'द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवुड्स बॅड बॉय संजय दत्त' या पुस्तकात आहे.
- पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, ऋचाने एका मुलाखतीत सांगितले होते- संजय आणि माझ्यात सर्वकाही आलबेल आहे. माझा संजयवर पूर्ण विश्वास आहे. मी जेव्हा संजयला विचारले की तो मला घटस्फोट देणार आहे का, यावर त्याचे उत्तर नाही होते. मी त्यालाही सांगितले होते, मला घटस्फोट नकोय. मला त्याच्यासोबत राहायचे आहे. उपचार अर्धवट सोडून मुंबईत आलेली ऋचा काही दिवसांनी न्यूयॉर्कला परतली होती.

 

पुढे वाचा, कशी होती ऋचा-संजयची लव्हस्टोरी, कशी झाली त्यांच्या आयुष्यात माधुरी दीक्षितची एंट्री यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...