आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : गँगरीनने ग्रस्त होती परवीन बाबी, अतिशय वेदनादायी होता शेवटचा काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथनी', 'शान', 'क्रांती', 'महान' या 70 आणि 80च्या दशकातील सिनेमांमध्ये परवीन बाबीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आजसुध्दा हे सिनेमे पाहिल्यास या ग्लॅमरस अभिनेत्रीच्या आठवणी ताज्या होतात. परवीनने 13 वर्षांपूर्वी अर्थातच आजच्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी 2005 रोजी जगाचा निरोप घेतला होता. तिच्या मृत्यूविषयी ऐकून सिनेसृष्टीला धक्काच बसला होता.

 

परवीनने आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस एक व्हिल चेअर, दोन कपडे, काही औषधे, पेंटींग्स आणि कॅनव्हास या वस्तूसोबत एकांतात घातले. असे सांगितले जाते, की परवीन मधूमेह आणि पायाच्या गँगरीन आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिची किडनी आणि शरीराच्या काही अवयवांनी काम करणे बंद केले होते. तिच्या आयुष्यातील शेवटची छायाचित्रे पाहून तिचा मृत्यू खरंच खूप वेदनादायक होता, हे दिसून येते.

 

अज्ञातवासात आयुष्य जगत होती परवीन-
2002मध्ये आईच्या निधनानंतर परवीनचे मानसिक संतुलन बिघडले होते. ती एकांतात राहायला लागली आणि केवळ एका चर्चच्या संपर्कात होती. ती याच धर्माची अनुयायी होती आणि कधी-कधी ती चर्चशी संपर्क साधायची. तिने आपल्या मृत्यूपूर्वी सर्व ओळखीच्या लोकांशी संपर्क तोडला होता, असे पोलिसांनी सांगितले होते. 20 वर्षांपासून तिच्या शेजारी राहणारे एम. एस. मल्होत्रा यांनीसुध्दा परवीनला इतक्या वर्षांमध्ये केवळ 15 वेळा पाहिले होते.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परवीनची शेवटच्या क्षणांची काही छायाचित्रे...