आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Ex Lovers Salman, Aishwarya, Sangeeta Bijlani Met At Zayed Khan Wedding Reception

13 वर्षांपूर्वी जाएद खानच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पोहोचले होते Ex-Lovers, बघा फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 2004 मध्ये दिग्दर्शक फराह खानच्या 'मै हूं ना' या सिनेमात लकी (लक्ष्मण प्रसाद शर्मा)च्या भूमिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता जाएद खान आज 38 वर्षांचा झाला आहे. 5 जुलै 1980 रोजी मुंबईमध्ये जन्मलेला जाएद टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते संजय खान आणि जरीन खान यांचा मुलगा आहे. जाएद चार-बहीण भावंडांमध्ये (सिमोन, सुझान, फराह आणि जाएद) सर्वात लहान आहे. त्याने वेल्हम बॉइज स्कूल, डेहरादून आणि कोडाइकनाल इंटरनॅशनल स्कूल, कोडाइकला (तामिळनाडू) येथून शिक्षण घेतले. त्याची पत्नी मलायका पारेख त्याच्या शाळेत शिकत होती. जाएदने लंडन फिल्म अॅकाडमीमधून फिल्म मेकींगचे धडे गिरवले.


अशी सुरु झाली होती जाएदची लव्ह स्टोरी.. 
जाएद खान 2005 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण मलायका पारेखसोबत बोहल्यावर चढला. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, की त्याने मलायकाला तीनवेळा प्रपोज केले होते. तिन्ही वेळच्या रिंग अजूनही मलायकाकडे आहेत. असे सांगितले जाते, की जाएद आणि मलायका लग्नापूर्वी 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांची पहिली भेट कोडाइकनाल इंटरनॅशनल स्कूल (तामिळनाडू) मध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. जाएद आणि मलायका आता जिदान आणि आरिज या दोन मुलांचे आई-वडील आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी जाएद मलायकासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. त्याचे लग्न बॉलिवूडमधील एक मोठा इव्हेंट ठरले होते. यामध्ये इंडस्ट्रीतील मोठमोठे स्टार्स त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला पोहोचले होते. जाएदच्या रिसेप्शन पार्टीत एक वेगळेच कॉम्बिनेशन बघायला मिळाले होते. 


ब्लॅक साडीत पोहोचली होती ऐश्वर्या... 
या रिसेप्शन पार्टीत एक हटके कॉम्बिनेशन बघायला मिळाले होते. ते म्हणजे सलमान खान, ऐश्वर्या राय आणि संगीता बिजलानी हे तिघे चक्क एका ठिकाणी जमले होते. या पार्टीत ऐश्वर्या तिची आई वृंदा रायबरोबर पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या ब्लॅक साडीत दिसली होती. तर संगीता बिजलानी कलरफूल साडीत आणि सलमान खान ब्लू शर्ट-डेनिममध्ये दिसला होता. जाएदच्या रिसेप्शनची ही छायाचित्रे यासाठी खास आहे, कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या स्टार्सची एक जुनी झलक बघायला मिळणारेय. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा साधारण 13 वर्षांपूर्वी कसे दिसायचे हे स्टार्स... 

बातम्या आणखी आहेत...