Home | Flashback | Bollywood Actress Mumtaz Gifted Mercedes To Amitabh Bachchan

मुमताजने पुर्ण केले होते अमिताभ बच्चन यांचे स्वप्न, दिले होते मोठे गिफ्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 01:10 PM IST

60's आणि 70'sच्या प्रसिध्द अभिनेत्री मुमताज 71 वर्षांच्या झाल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला.

 • Bollywood Actress Mumtaz Gifted Mercedes To Amitabh Bachchan

  मुंबई : 60's आणि 70'sच्या प्रसिध्द अभिनेत्री मुमताज 71 वर्षांच्या झाल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. 1990 मध्ये आलेल्या 'आंधिया' चित्रपटात त्या शेवटच्या वेळी दिसल्या होत्या. दारा सिंह आणि राजेश खन्नासोबत अनेक हिट चित्रपट देणा-या मुमताज यांनी आपल्या स्टारडमच्या काळात न्यूकमर राहिलेल्या अमिताभ बच्चनसोबत काम केले. दोघांनी 1973 मध्ये 'बंधे हाथ' चित्रपटात काम केले. त्यावेळी त्यांचा एक किस्सा प्रसिध्द होता.


  मुमताजने अमिताभला गिफ्ट केली होती मर्सिडिज
  - मुमताजने अमिताभसोबत काम केले, त्यावेळी त्या इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींमधून एक होत्या. तर बिग बी तेव्हा अभिनयात आपले करिअर बनवत होते.
  - चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुमताज मर्सिडीजने सेटवर यायच्या. शूटिंग सेटवर त्यांचीच कार सर्वात महागडी होती. अमिताभ साधारण कारने यायचे.
  - अनेक लोक मुमताज यांच्या कारवर इम्प्रेस होते, अमिताभही इम्प्रेस होते. एकदा शूटिंग दरम्यान अमिताभ त्यांच्या फ्रेंड्सला म्हणाले की, एक दिवस ते सुध्दा मर्सिडीजने येतील.
  - ज्यावेळी मुमताज यांना हे कळाले तेव्हा त्यांनी अमिताभ यांना स्वतःची मर्सिडीज गिफ्ट केली. शूटिंगनंतर एकदा मुमताज, अमिताभ यांची कार घेऊन निघून गेल्या आणि त्यांच्या गाडीची चावी अमिताभसाठी ठेवली. मुमताच्या या अंदाजामुळे ते चकित झाले.

  आता पतीसोबत लंडनमध्ये राहतात मुमताज
  - मुमताज आता पती मयूर माधवानीसोबत लंडनमध्ये राहतात. त्यांनी 1974 मध्ये बिझनेसमन मयूर माधवानीसोबत लग्न केले होते.
  - मुमताज आणि मयूर यांच्या दोन मुली आहेत, त्यांचे नाव नताशा आणि तान्या आहे.
  - नताशाने अॅक्टर फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानसोबत 2005 मध्ये लग्न केले. तर तान्याने 2015 मध्ये बॉयफ्रेंड मार्कोसोबत लंडनमध्ये लग्न केले.


  हे आहेत मुमताज यांचे प्रसिध्द चित्रपट
  - मुमताज यांनी 1963 मध्ये आलेल्या 'सेहरा' मधून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी एकाच वर्षात अजून चार चित्रपटात काम केले. परंतू त्यांना 1969 मध्ये सुपरस्टार राजेश खन्नासोबत ओळख मिळाली.
  - 1969 ते 74 पर्यंत या दोघांनी 'दो रास्ते', 'सच्चा झूठा', 'अपना देश', 'दुश्मन', 'बंधन' आणि 'रोटी' सारख्या यशस्वी चित्रपटात काम केले. 1990 मध्ये मुमताज या पुन्हा चित्रपटात आले. परंतू यावेळी त्यांना ते यश मिळाले नाही.

Trending