Home | Flashback | Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

मोहम्मद रफी यांच्या आयुष्यातील लोकप्रिय किस्से, वीज गेल्याने चमकले होते मोहम्मद रफी यांचे नशीब

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 03:26 PM IST

31 जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी असते.. ते संगीत क्षेत्रातील लोकप्रिय आणि प्रसिध्द कलाकार होते.

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  31 जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी असते.. ते संगीत क्षेत्रातील लोकप्रिय आणि प्रसिध्द कलाकार होते. क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की मोहम्मद यांचे नशीब वीज गेल्याने चमकले होते. एका इव्हेंटमध्ये प्रसिध्द गायक के. एल. सहगल यांनी स्टेजवर वीज गेल्याने गाणे म्हणण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिथे उपस्थित 13 वर्षीय मोहम्मद रफी यांना गाणे गाण्याची संधी मिळाली होती.
  त्यांचे गाणे ऐकून हिंदी सिनेमाचे प्रसिध्द संगीतकार श्यामसुंदर यांनी मुंबईला येण्याचा निमंत्रण दिले. अशाप्रकारे मोहम्मद रफी यांच्या गायन करिअरची सुरुवात झाली. त्यांचे पहिले गाणे एका पंजाबी सिनेमा 'गुल बलोच'मध्ये होते. त्यांनी पहिले हिंदी गाणे नौशाद यांच्यासाठी 'पहले आप' सिनेमासाठी गायले होते.
  बैजू-बावरामध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. नौशाद, शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, ओ.पी. नैय्यर, मदन मोहनसारख्या संगीत दिग्दर्शकांची पहिली पसंत बनलेले रफी दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, शम्मी कपूर आणि राजेश खन्नासारख्या लोकप्रिय कलाकारांचे आवाज बनले.


  23वेळा मिळले फिल्मफेअर नॉमिनेशन
  1960च्या ब्लॉकबस्टर 'मुगल-ए-आजम' सिनेमासाठी रफी साहेबांनी गायलेले 'मोहब्बत जिंदाबाद' गाणे खूप गाजले. या गाण्यात त्यांच्यासोबत इतर 100 गायकांनी काम केले होते. रफी साहेब संपूर्ण करिअरमध्ये 23वेळा फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेट झाले होते. त्यांना हा पुरस्कार 6वेळा मिळाला होता.


  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या मोहम्मद रफी यांच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  अमिताभ बच्चन यांचे चाहते होते रफी-  

  मोहम्मद रफी यांना सिनेमा पाहण्याची आवड नव्हती. परंतु कधी-कधी सिनेमा पाहत होते. एकदा रफी यांनी अमिताभ यांना 'दीवार' सिनेमा पाहिला. 'दीवार' पाहिल्यानंतर ते अमिताभ यांचे मोठे चाहते झाले. 
   
  1980मध्ये रिलीज झालेल्या 'नसीब' सिनेमात रफी यांना अमिताभसोबत 'चल चल मेरे भाई' गाणे गाण्याची संधी मिळाली. अमिताभ यांच्यासोबत हे गाणे गायल्यानंतर रफींच्या आनंदाचा पारावार उरला नाही. 
   
  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 'फीको' होते रफी यांचे निक नेम...    


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  'फीको' होते रफी यांचे निक नेम...
   
  क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की जगात रफी साहेब नावाने ओळखल्या जाणा-या रफी यांचे निकनेम 'फीको' होते. रफी साहेबांना त्यांच्या घरातील जेष्ठ 'फीको' नावाने हाक मारत होते. 
  रफी यांच्या संगीत करिअरचा किस्सासुध्दा अनोखा आहे. त्यांनी आपल्या गावात एका फकीराला गाताना ऐकले होते. तेव्हा त्यांनी गाणे गाण्यास सुरुवात केली होती आणि पाहता-पाहता संगीत क्षेत्रातील 'बादशाह' झाले. रफी यांच्या कुटुंबाचे लाहोरमध्ये एक सलूनचे दुकान होते. 
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, फारसी भाषेतही गायली गाणी... 

   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  फारसी भाषेतही गायली गाणी- 

  मोहम्मद रफी संगीत क्षेत्रात संपूर्ण आयुष्य जगले. त्यांनी केवळ भारतीय गायकांसोबतच नव्हे तर 1975मध्ये त्यांनी स्वीकार केले होते, की फारसी भाषेतही त्यांनी एक गाणे रेकॉर्ड केले होते. डुएटमध्ये त्यांनी आफगाणी फिमेल सिंगर झीलासोबत एक गाणे गायले होते. 
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, किशोर कुमार यांच्यासोबत होते घट्ट मैत्री... 


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  किशोर कुमार यांच्यासोबत होती मैत्री-
   
  मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची घट्ट मैत्री होती. दोन्ही महान गायक फावल्या वेळेत तासन् तासस गप्पा मारत होते. यादरम्यान संगीताशिवाय दोघे संगीतात नव-नवीन प्रयोगावर अनेक वेळ गप्पा मारत बसायचे. रफी यांच्या निधनानंतर किशोर कुमार त्यांच्या मृतदेहाजवळ बसून काही तास गुडघ्यावर बसून रडत होते. 
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ओळख न दाखवता करत होते मदत...


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  ओळख न दाखवता करत होते मदत... 
   
  रफी यांच्याविषयी आणखी एक रंजक गोष्ट अशी, की त्यांच्या घरापासून काही अंतरावर एक गरीब विधवा राहत होती. ती कमावून खाऊ शकत नव्हती. त्यावेळी रफी यांनी अनेक वर्षे तिला मनी ऑर्डर पाठवून तिची मदत केली होती. त्या महिलेला माहित नव्हते, की मनी ऑर्डर कोण पाठवत आहे. रफी यांच्या निधनानंतर जेव्हा तिला पैसे मिळणे बंद झाले तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिने माहिती मिळवली होती. तेव्हा तिला माहिती झाले, की हे पैसे रफी पाठवत होते. 
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मैत्री निभावण्यासाठी नेहमी अव्वल....


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  मैत्री निभावण्यासाठी नेहमी अव्वल- 

  मोहम्मद रफी यांना जवळून ओळखणारे सांगतात, त्यांच्या गाण्यात जितका गोडवा होता, तितकाच गोडवा त्यांच्या मैत्रीतही होता. मैत्री निभावण्यात रफी अव्वल होते. संगीतकार निसार वाजमीसाठी मोहम्मद यांनी अनेकदा त्यांच्या विनंतीवर गाणे गायले होते. त्यासाठी रफी यांनी केवळ एक रुपया घेतला होता.
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इंग्रजी गाणीसुध्दा गायली..


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  इंग्रजी गाणेसुध्दा गायले- 
   
  रफी यांना भाषेचे बंधन नव्हते. सुरुवातीला त्यांची इंग्रजी पक्की नव्हती, परंतु नंतर हरिन्द्र नाथ चट्टोपाध्याय यांच्याकडून इंग्रजी शिकले. त्यांच्यासाठी रफी यांनी इंग्रजी भाषेत दोन गाणी गायली होती. या गाण्याचे शिर्षक होते, ''although we hail' आणि 'the she i love'. 
   
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मन्ना डे आणि किशोर कुमार यांच्यासोबत होती स्पर्धा... 


   

 • Death Anniversary Some Interesting Facts About Mohammed Rafi

  मन्ना डे आणि किशोर कुमार यांच्या होती स्पर्धा- 

  भारताच्या महान गायकांमध्ये सामील मन्ना डे एकदा म्हणाले होते, 'माझ्यात आणि किशोर दा यांच्यात दुस-या क्रमाकांचे स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असायची. कारण होते, की नंबर एकवर मोहम्मद रफी होते आणि आजही ते एक नंबरवर आहेत.'
   

Trending