Home | Flashback | Meena Kumari Birthday Story

Facts:दुःखात गेले 'ट्रॅजेडी क्वीन'चे आयुष्य, असे आहेत त्यांच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 03:12 PM IST

'ट्रॅजेडी क्वीन' या नावाने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मीनाकुमारी यांची आज 1 ऑगस्ट रोजी बर्थ अॅनिवर्सरी आहे.

 • Meena Kumari Birthday Story

  'ट्रॅजेडी क्वीन' या नावाने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मीनाकुमारी यांची आज 1 ऑगस्ट रोजी बर्थ अॅनिवर्सरी आहे. 1 ऑगस्ट 1933 साली जन्मलेल्या मीना कुमारी यांचे खरे नाव महजबी बानो होते. ते त्यांचे प्रोफेशनल लाईफ तसेच पर्सनल लाईफमुळे फार चटर्चेत राहिल्या. त्यांचे व्यक्तिगत आयुष्य फार त्रासात गेले. त्या कायम त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम शोधत राहिल्या पण त्यांचा शोध त्यांच्या मृत्यूसोबतच संपला.


  असे म्हणतात की, त्या 'साहिब, बीवी और गुलाम' (1962) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दारुच्या नशेत बुडाल्या. त्यांना दारु पिल्याशिवाय शूटिंग केले जात नसे. प्रेमात नेहमीच आलेले अपयश त्यांच्या दुःखाचे मुळ कारण होते. प्रेमात असताना त्यांना अनेकदा धोका, अपमान सहन करावा लागला. या सर्वांमुळे त्यांचे आयुष्य एक दुःखद कथा बनले होते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना लिव्हर सिरोसिस आजार झाला होता.


  पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा, धर्मेंद्र यांनी मीनाकुमारी यांना मारली होती कानाखाली...

 • Meena Kumari Birthday Story

  धर्मेंद्रने मारली होती मीनाकुमारी यांच्या कानाखाली..

   

  असे म्हणतात की, पती कमाल अमरोही यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मीनाकुमारी यांचे धर्मेंद्रबरोबर अफेअर होते. धर्मेंद्र त्यावेळी चित्रपटसृष्टीत अतिशय नवखे होते अशावेळी मीनाकुमारी यांनीच धर्मेंद्र यांना फार मदत केली होती. परंतू धर्मेंद्र यांनी सेटवर असताना मीनाकुमारी यांच्या कानाखाली मारली होती. हे प्रकरण त्यावेळी फार गाजले होते.
   

 • Meena Kumari Birthday Story

  घटस्फोटाने नैराश्यात गेल्या होत्या मीनाकुमारी..

   

  एका चित्रपटाच्या सेटवर मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची पहिली भेट झाली होती. मीना कुमारीपेक्षा कमाल अमरोही 15 वर्षांनी मोठे आणि विवाहीत होते. तरीसुद्धा मीना कुमारी यांनी त्यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांच्या नात्यात प्रॉब्लेम सुरु झाले आणि ते वेगळे झाले. 1964 साली मीना कुमारी-कमाल अमरोही यांचा घटस्फोट झाला. 

   

 • Meena Kumari Birthday Story

  लहानपण गेले आश्रमात..

   

  मीना कुमारी यांचे लहानपण एका

  मुस्लिम आश्रमात गेले. त्यांचे वडील अली बख्श थिएटरमध्ये काम करत असत तर त्यांची आई बेगम अली बख्शी अली बख्शी यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मीना कुमारी यांना दोन बहिणी होत्या. 

   

 • Meena Kumari Birthday Story

  तब्येत खराब असूनही 'पाकिजा' चित्रपटात केले काम..

   

  घटस्फोट झाल्यानंतर मीनाकुमारी आणखी जास्त ड्रिंक करू लागल्या. जास्त ड्रिंक केल्यामुळे मीनाकुमारीचे सौंदर्य पूर्वीप्रमाणे दिसत नव्हते, परंतु तरीदेखील त्यांनी 'पाकिजा'मध्ये काम करून स्वत: वेगळी ओळख दिली. 'पाकिजा' क्लासिक सिनेमांमध्ये सामील झाला

   

 • Meena Kumari Birthday Story

  निधनानंतर हिट झाला 'पाकिजा'

   

  पाकिजा सिनेमा फेब्रुवारी 1972मध्ये रिलीज झाला आणि त्याच्या दोन आठवड्यांनी मीनी कुमारी यांची प्रकृती जास्त खालावली. 31 मार्च 1932 रोजी त्यांनी जगाला निरोप घेतला. मात्र, त्यांचा 'पाकिजा' सुपरहिट झाला.

   

 • Meena Kumari Birthday Story

  आयुष्याच्या शेवटच्या काळात आला होता एकाकीपणा..

   

  अनेक सिनेमांमध्ये काम करून उत्कृष्ट अभिनेत्रीचा दर्जा मिळवूनसुध्दा मीना कुमारी यांच्याकडे आयुष्याच्या शेवटच्या काळात स्वत:वर उपचार करण्यासाठी पैसे उरले नव्हते. 1972मध्ये जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा रुग्णालयाचे पैसे कसे फेडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे, त्यांचे घटस्फोटीत पती कमाल अमरोहीसुध्दा त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आले नव्हते. मानी कुमारी यांनी आजारपणातसुध्दा कमाल अमरोही यांच्या 'पाकिजा' सिनेमात काम केले होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यात मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला होता.

   

 • Meena Kumari Birthday Story

  अनेक पुरुषांसह जुळले मीनाकुमारीचे नाव...

  मीना कुमारी यांचे नाव अनेक पुरुषांसोबत जुळले होते. 'बैजू बावरा' या सिनेमाच्यावेळी नायक भारत भूषण यांनी मीना कुमारी यांच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याशिवाय अभिनेता राजकुमार यांचेही मीना कुमारी यांच्यावर प्रेम जडले होते. 
   

Trending