Home »Flashback» Actor Amjad Khan Rare Photographs

अभिनेते अमजद खान यांना आयुष्यभर राहिली होती एका गोष्टीची खंत, बघा आठवणीतील छायाचित्रे

दिव्य मराठी वेब टीम | Jul 27, 2017, 19:23 PM IST

बॉलिवूडचे गब्बर सिंग अर्थातच अभिनेते अमजद खान यांची आज 25 वी पुण्यतिथी आहे. 27 जुलै 1992 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. 'शोले' या सिनेमातील गब्बर सिंगच्या भूमिकेमुळे त्यांनी लोकप्रियतेचे यशोशिखर गाठले होते. अमजद खान यांचे थोरले पुत्र शादाब खान यांनी अमजद खान यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
आज अमदज खान साहेबांविषयीच्या कुठल्या आठवणी दाटून आल्या आहेत?
- माझ्या वडिलांचे निधन 1992 साली झाले होते. जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा मी 18 वर्षांचा होतो. तर माझा भाऊ 10 आणि बहीण 14 वर्षांची होती. तो दिवस आठवला, की आजही खूप दुःख होतं. कारण खूप आठवणी दाटून येतात. अनेक गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो, मात्र काही गोष्टी आठवत नाहीत.

आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पाहुयात त्यांची आठवणीतील निवडक छायाचित्रे आणि शादाब खान यांनी काय सांगितले अमजद खान यांच्याविषयी...

Next Article

Recommended