आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Nutan Wear Swimsuit For The First Time In Indian Screen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पडद्यावर स्विमसूट परिधान करणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या नूतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('दिल्ली का ठग' या सिनेमातील एका दृश्यात नूतन)
मुंबईः ''सावन का महीना... पवन करे शोर...'' हे गाणे आठवताच डोळ्यांसमोर येतात त्या अभिनेत्री नूतन. नूतन समर्थ आणि नूतन बहल या नावांनी तुम्ही यांना ओळखता. 4 जून 1936 रोजी जन्मलेल्या नूतन यांना अभिनयाचे बाळकडून त्यांच्या आईकडूनच मिळाले होते. अभिनेत्रींना शोपीसच्या रुपात करण्यात येण्याच्या पारंपरिक विचारांना नूतन यांनी फाटा दिला होता.
'सुजाता', 'बंदिनी', 'मैं तुलसी तेरे आंगन की', 'सीमा', 'सरस्वती चंद्र', आणि 'मिलन' यांसारख्या सिनेमांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नूतन यांनी सिद्ध केले होते, की नायिकांमध्येसुद्धा अभिनय क्षमता असून त्या अभिनय आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना थिएटरकडे खेचू शकतात.
स्विमसूट परिधान करुन केले होते सर्वांना आश्चर्यचकित...
1958मध्ये रिलीज झालेल्या 'दिल्ली का ठग' या सिनेमात नूतन यांनी स्विमसूट परिधान करुन सगळ्यांना अचंबित केले होते. शिवाय 'बारिश' या सिनेमात त्यांनी बरेच बोल्ड सीन्स दिले होते. नूतम यांचे म्हणणे होते, की एका कलाकाराला पटकथेच्या गरजेनुसार स्वतःत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
पुसून काढली बोल्ड इमेज...
स्विमसूट परिधान केल्याने नूतन यांच्यावर बरीच टिका झाली होती. मात्र विमन राय यांच्या 'सुजाता' आणि 'बंदिनी' या सिनेमांमध्ये धीरगंभीर भूमिका साकारुन त्यांनी आपली बोल्ड अभिनेत्रीची इमेज पूसून काढली. 1959 मध्ये रिलीज झालेला 'सुजाता' हा सिनेमा नूतन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.
21 फेब्रुवारी 1991 मध्ये जगाचा कायमचा निरोप घेणा-या नूतन आपल्या कलाकृतींमधून कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दिल्ली का ठग' आणि 'बारिश' या सिनेमातील नूतन यांची निवडक छायाचित्रे...