आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sadhna Expired Today, She Was An Aunt To Kareena And Karisma Kapoor

करीना-करिश्माच्या मावशी होत्या साधना, पाहा आठवणीतील छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः साधन, करीना आणि करिश्मा कपूर - Divya Marathi
फाइल फोटोः साधन, करीना आणि करिश्मा कपूर

मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध साधना शिवदासानी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. साधना यांच्या निधनाने एकेकाळी चंदेरी दुनियेतील फॅशन आयकॉन राहिलेल्या एका देखण्या आणि गुणी अभिनेत्रीला सिनेसृष्टी मुकली आहे. साधना यांनी 60 ते 70 च्या दशकात जवळपास 35 हिट सिनेमांमध्ये काम केले होते. यात ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘गीता मेरा नाम’ या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.
करीना-करिश्माच्या होत्या मावशी
साधना यांचे अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत मावशी-भाचीचे नाते होते. करीना-करिश्माची आई बबिता यांच्या त्या चुलत भगिनी होत्या. 2002 साली साधना यांना आयफा पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या मुंबईत गायिका आशा भोसले यांच्या बिल्डिंगमध्ये भाडे तत्वावर वास्तव्याला होत्या.
तोंडाच्या कर्करोगाने होत्या पीडित
अभिनेत्री साधना यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तोंडाच्या कर्करोगाने प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईच्या के. के. जे. सोमैय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
आर. के. नायर यांच्यासोबत झाले होते लग्न
बॉलिवूडमध्ये हिरोईनच्या रुपात त्या सर्वप्रथम आर. के. नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या सिनेमात झळकल्या होत्या. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान साधन यांचे आर. के. नायर यांच्यासोबत सूत जुळले आणि 7 मार्च 1966 रोजी त्यांनी लग्न केले. 1995 मध्ये अस्थमामुळे नायर यांचे निधन झाले होते.
आपल्या अभिनय, सौंदर्य आणि हेअरस्टाइलमुळे प्रसिद्ध झालेल्या साधना आता आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात असतील. साधना यांची आठवणीतील छायाचित्रे पाहा, पुढील स्लाईड्समध्ये... (साधना यांच्या बालपणीची, लग्नाची आणि सिनेमातील छायाचित्रांचा यामध्ये समावेश आहे.)