आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अंबानींच्या पत्नीपासून ते झीनत अमानपर्यंत, देव आनंद होते यांचे मेंटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- झीनत अमानसोबत देव आनंद - Divya Marathi
फाइल फोटो- झीनत अमानसोबत देव आनंद

एन्टरटेन्मेंट डेस्कः देव आनंद बॉलिवूड सिनेसृष्टीतील असे एक अभिनेते होते, ज्यांनी त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त खास अंदाने वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 26 सप्टेंबर 1923 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले देव आनंद यांना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी ठरवले होते.
देव आनंद केवळ सिनेसृष्टीत यशस्वीच ठरले नाहीत, तर त्यांनी अनेक नवोदितांना या क्षेत्रात संधी दिली. बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट अभिनेत्रींना आणण्याचे श्रेय त्यांना जाते.
झीनत अमान
सिनेमा- हरे रामा हरे कृष्णा
झीनत अमानला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते. 1971 मध्ये रिली झालेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या सिनेमात झीनत पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर अवतरली आणि प्रेक्षक तिला बघतच राहिले. या सिनेमासाठी देव आनंद सहा महिन्यांपासून नव्या चेह-याच्या शोधात होते. एका पार्टीत त्यांची भेट मिस एशिया ठरलेल्या झीनत अमानसोबत झाली आणि त्यांनी तिला सिनेमासाठी साइन केले.
पुढील स्लाइड्समध्ये, जाणून घ्या अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी, ज्यांना देव आनंद यांनी मोठा ब्रेक दिला...