आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya And Abhishek Bachchan Mehndi Ceremony Pics

Flashback: मुलाच्या लग्नात बिग बींना आवरला नव्हता मेंदी काढण्याचा मोह, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मेंदी कार्यक्रमातील छायाचित्रे.. - Divya Marathi
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मेंदी कार्यक्रमातील छायाचित्रे..

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा लाडका लेक अभिषेक बच्चन आणि सूनबाई ऐश्वर्या आज आपल्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा करत आहेत. 20 एप्रिल 2007 रोजी शाही थाटात अभिषेक आणि ऐश्वर्या बोहल्यावर चढले होते. यांच्या लग्नाचा थाट बघण्यासारखा होता. या दोघांच्या लग्नासाठी खास राजस्थान येथील सोजतमधून 15 किलो मेंदी मागवण्यात आली होती. मेंदी सेरेमनीत ऐश्वर्याने नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा लहेंगा परिधान केला होता.
नवरदेव अभिषेकच्या हातावर छोटी मेंदी काढण्यात आली होती. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नात हातावर मेंदी काढण्याचा मोह बिग बींना आवरता आला नव्हता. अभिषेकच्या लग्नात अमिताभ यांनीही हातावर सुरेख मेंदी काढून घेतली होती. जया बच्चन यांनीही सुंदर मेंदी हातावर काढली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मेंदी सेरेमनीची खास छायाचित्रे दाखवत आहोत..