आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Completed 21 Years Of Winning Miss World Title

ऐश्वर्या राय बच्चनला MISS WORLD होऊन उलटली 21 वर्षे, पाहा 1994चे फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करुन नुकतीच 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 19 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 21 वर्षी तिने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी केला होता. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी एन्टरटेन्मेंट सेंटरमध्ये 87 देशांच्या मॉडेल्सना पिछाडत ऐश्वर्याने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची बॅसेतस्ना मॅकगालेमे पहिली रनरअप आणि व्हॅनेज्युएलाची इरिन फेरीरा दुसरी रनरअप ठरली होती.
मिस वर्ल्ड 1993ने डोक्यावर सजवला ताज
ऐश्वर्या रायच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज 1993च्या मिस वर्ल्ड जमॅकाची रहिवासी लीसा हन्नाने सजवला होता. मिस वर्ल्डचा ताज डोक्यावर सजवणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966मध्ये मुंबईची रीता फारियाने हा पुरस्कार जिंकला होता.
सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड
ऐश्वर्या राय बच्चनला 2014च्या मिस वर्ल्ड पीजेंटदरम्यान सर्वात यशस्वी मॉडेलचा सन्मान देण्यात आला होता. डिसेंबर 2014मध्ये झालेल्या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
ऐश्वर्याची मिस वर्ल्ड स्पर्धेतील 1994 मध्ये क्लिक झालेली खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत..