आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance : आदेश यांची पहिली पुण्यतिथी, बिग बींना कवटाळून पत्नीने फोडला होता टाहो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - आदेश श्रीवास्तव यांची अंत्ययात्रा, बिग बींना कवटाळून टाहो फोडताना आदेश यांच्या पत्नी विजेता पंडीत - Divya Marathi
डावीकडून - आदेश श्रीवास्तव यांची अंत्ययात्रा, बिग बींना कवटाळून टाहो फोडताना आदेश यांच्या पत्नी विजेता पंडीत
मुंबईः प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी ५ सप्टेंबर रोजी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. निधनापूर्वी 44 दिवस ते हॉस्पिटलमध्येच होते. विशेष म्हणजे ४ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असायचा. वाढदिवसाच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले.

बॉलिवूडने फिरवली होती पाठ...
जेव्हा आदेश यांना त्यांच्या आजाराविषयी कळले होते, तेव्हा याच बॉलिवूडने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर मुंबईत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर बॉलिवूडच्या एकाही कलाकाराने त्यांची भेट घेतली नव्हती. यामुळे ते अधिक दुःखी झाले होते. या आजारापेक्षा कोणीही भेटायला आले नाही हे जास्त त्रासदायक असल्याचे ते एकदा म्हणाले होते.
अभिनेत्री विजेता पंडीत होती पत्नी...
सिंगिगमध्ये करिअर केल्यानंतर आदेश यांनी संगीतकार जतिन-ललित यांची बहीण विजेता पंडीतसोबत लग्न केले. अवितेश आणि अनिवेश ही त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत.

अंत्यसंस्काराला पोहोचले होते कलाकार...
मुंबईतील ओशिवारा येथे आदेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांना अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, अनिल कपूर, दिग्दर्शक अनीज बज्मी, गायक अभिजीत भट्टाचार्य, निर्माते रमेश तौरानी, गायिका अलका याज्ञिक, गायक अभिजीत सावंत, सुनील पाल, राजू श्रीवास्तवसह अनेकजण पोहोचले होते. विजेता यांना यावेळी आपले दुःख अनावर झाले होते. त्यांनी बिग बींना कवटाळून टाहो फोडला होता. बिग बीसुद्धा खूप शोकाकूल दिसले. 'बाबुल', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम' या सिनेमांसाठी बिग बींनी आदेश यांच्यासोबत काम केले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आदेश श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...