Home »Flashback» Amitabh Bachchan Special Story On Birthday

कधीच सासरी गेल्या नव्हत्या अमिताभ यांच्या आई, सासरच्यांच्या एका गोष्टीने दुखावले होते मन

सूर्य प्रकाश त्रिपाठी | Oct 09, 2017, 14:56 PM IST

  • आई तेजी बच्चन यांच्यासोबत अमिताभ बच्चन
अलाहाबादः अभिनेते अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबर रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. अलाहाबादमध्ये जन्मलेले अमिताभ यांचे वडील हरिवशंराय बच्चन अलाहाबादपासून 65 किलो मीटर अंतरावर असलेल्या प्रतापगढ तालुक्यातील बाबू पट्टी या गावातील रहिवाशी होते. त्यांचे कौटुंबिक मित्र असलेले महेश बाबू गुप्ता यांचे मित्र शार्देंदू महेश यांच्यासोबत झालेल्या बातचितच्या आधारावर भास्कर वाचकांना अमिताभ यांच्या आईवडिलांच्या संदर्भातील खास गोष्टी सांगत आहे.
पत्रात सहीच्या ठिकाणावर Good असे लिहायचे हरिवंशराय बच्चन...
- शार्देंदू यांनी सांगितले, की डॉ. हरिवंशराय बच्चन पत्रात सहीच्या ठिकाणी कधीच सही करत नसे. ते त्या ठिकाणी GOOD असे लिहायचे. हीच त्यांची स्वाक्षरी समजली जायची. या हरिवंश राय बच्चन आपले गूड लक म्हणत असे.
- हरिवंश राय नेहमीच आपल्या सर्व मित्रांच्या संपर्कात राहात असे. ते पत्र लिहून आपल्या मित्रांची खुशाली विचारत असतं.

कसे पडले हरिवंश काय हे नाव...
- असे म्हटले जाते, की हरिवंश राय यांचे वडील प्रताप नारायण श्रीवास्तव आणि आई सरस्वती देवी यांच्या घरी मुलाचा जन्म होत नव्हता. तेव्हा एका भटजींच्या सांगण्यावरुन प्रताप नारायण यांनी प्रतापगढच्या बाबू पट्टीपासून प्रयागपर्यंत पायी यात्रा केली आणि तेथे जाऊन हरिवंश पुराण ऐकले.
- त्यानंतर त्यांच्या घरी हरिवंश राय बच्चन यांचा जन्म झाला. घरी त्यांना बच्चन (छोटा मुलगा) असे म्हटले जायचे. पण शाळेत हरिवंश पुराणाच्या आधारावर त्यांचे नाव हरिवंश राय असे ठेवण्यात आले.

आयुष्यभर कधीच सासरी गेल्या नाहीत तेजी बच्चन...
- 24 जानेवारी 1942 रोजी हरिवंश राय आणि तेजी सुरी यांचे रजिस्टर्ड लग्न झाले. लग्नानंतर हरिवंश राय बच्चन आपले आईवडिलांचे घर सोडून अलाहाबादच्या सिव्हिल लाइन्सस्थित शंकर तिवारी यांच्या बंगल्यात भाड्याने राहू लागले.
- कायस्थ कुटुंबातील बच्चन यांचे पंजाबी तरुणीसोबत लग्न करणे हे त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. हरिवंश राय बच्चन यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
- सासू सरस्वती देवी आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नाराजीमुळे तेजी बच्चन कायम दुःखी होत्या. याच कारणामुळे त्या कधीच त्यांच्या सासरी गेल्या नाहीत.

पुढे वाचा, अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंश राय बच्चन यांच्याविषयीच्या खास गोष्टी... कशी झाली होती त्यांची पहिली भेट, श्रीमंत घरातून होत्या तेजी बच्चन, तेजी बच्चन यांच्या वडिलांना का म्हटले जायचे खजानासिंग, का मिळाला नव्हता तेजी बच्चन यांना वडिलांच्या संपत्तीत वाटा, यासह बरंच काही...

Next Article

Recommended