आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कितने आदमी...'ने रात्रीतून बनवले स्टार, वाचा अमजद खानचे लोकप्रिय डायलॉग्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'कितने आदमी थे...' 'शोले' सिनेमातील हा डायलॉग ऐकूनच आपल्याला गब्बरची आठवण येते. 'शोले' सिनेमात गब्बरची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. सांगितले जाते, की या डायलॉगमुळे अमजद खान रात्रीतून स्टार झाले होते. एक सत्य असेही आहे, की 'शोले'पूर्वी अमजद खान यांना क्वचितच लोक ओळखत होते. मात्र या सिनेमातील गब्बरच्या भूमिकेने त्यांना स्टारडम मिळवून दिले.
12 नोव्हेंबर 1940 रोजी पेशावर, ब्रिटीश इंडिया (आता पाकिस्तान)मध्ये जन्मलेल्या अमजद यांचे 27 जुलै 1992 रोजी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांचा मृत्यू होऊ 23 वर्षे उलटून गेलीत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास 130 सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत.
divyamarathi.com तुम्हाला अमजद खान यांच्या काही सिनेमांतील हिट डायलॉग्स सांगत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अमजद यांचे लोकप्रिय डायलॉग्स...