Home »Flashback» Amjad Khan Unheard Facts

Remembrance : एका अपघातानंतर वाढले होते 'गब्बर सिंग'चे वजन, 6 वर्षांनी झाले निधन

दिव्य मराठी वेब टीम | Jul 27, 2017, 17:49 PM IST

बॉलिवूडचे गब्बर सिंग अर्थातच अभिनेते अमजद खान यांची आज 25 वी पुण्यतिथी आहे. 27 जुलै 1992 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. एका अपघातानंतर अमजद यांचे वजन झपाट्याने वाढत गेले, हेच त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरले.
कधी झाला होता अमजद यांना अपघात..
- ही 1986 सालीची गोष्ट आहे. एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने अमजद खान मुंबईहून गोव्याला निघाले होते. वाटेत त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला.
- हा अपघात एवढा भयावह होता, की अमजद खान कोमात गेले होते. पण नशीबाने ते लवकर या आजारपणातून सावरले.
- पण औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे त्यांचे वजन सतत वाढत राहिले. त्यामुळे त्यांना तब्येतीच्या तक्रारी वाढल्या होत्या.
- 1992 साली वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 'बेचैन', 'रुदाली' आणि 'अनोखी चाल' सह 10 हून अधिक सिनेमे त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले होते.
पुढील 7 स्लाईड्सवर वाचा, अमजद खान यांच्या आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स...

Next Article

Recommended