Home »Flashback» Birthday Special Asha Parekh And Other 4 Unmarried Actresses Of Bollywood

आशा पारेखसह गतकाळातील 4 बॉलिवूड अॅक्ट्रेसेस प्रेमभंगानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित

दिव्य मराठी वेब टीम | Oct 02, 2017, 11:18 AM IST

मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा भोसले यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे (2 ऑक्टोबर 1942) पूर्ण केली आहेत. 1959 ते 1973 या काळात त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या आता डान्स अकादमी चालवत आहेत. 1959 मध्ये 'दिल दे के देखो' या सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. याच काळात आशा पारेख आणि नासिर यांच्यात सूत जुळले होते. मात्र त्यावेळी नासिर विवाहित होते.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आशा पारेख यांनी सांगितले होते, की एक पुरुष त्यांच्या आयुष्यात होता. मात्र आपल्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलणे त्यांनी टाळले होते. नासिर यांचे 2002मध्ये निधन झाले. आशाजींनी सांगितले होते, की नासिर यांच्या निधनाच्या एका दिवसापूर्वीच त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते.
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. काहींचे प्रेम यशस्वी होते, तर काहींना प्रेमभंगाला सामोरे जावे लागते. हिंदी सिनेसृष्टीतील काही नायिका अशा आहेत, ज्यांचे एखाद्यावर प्रेम जडले खरे, मात्र ते नाते पुढे जाऊ शकले नाही आणि त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील गतकाळातील अशाच नायिकांविषयी सांगत आहोत, ज्या प्रेमभंगानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या.पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या अभिनेत्रींविषयी...

Next Article

Recommended