आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bady Special Bollywood Actress Zeenat Aman Unknown Facts

नवरा करायचा झीनत अमानला मारहाण, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जुळले होते सूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- संजय खान, झीनत अमान - Divya Marathi
फाइल फोटो- संजय खान, झीनत अमान
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 1970 साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनतने लॉस एंजिल्समधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. झीनतने मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1971 साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 70 च्या दशकात झीनतची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकत होती.
करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. संजय खानबरोबरचे अफेअर आणि मारहाणीच्या घटनेमुळे झीनत चर्चेत राहिली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, झीनतचे खासगी आयुष्य आणि करिअरशी निगडीत वादांविषयी..