(फाइल फोटो- डावीकडे पत्नी नीला देवीसोबत शम्मी. उजवीकडे पहिली पत्नी गीता बालीसोबत शम्मी)
आज बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते शम्मी कपूर यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचे नाव शमशेर राज कपूर होते. शम्मी यांनी बॉलिवूडमध्ये बदल घडवला. त्यांनी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांप्रमाणे एकसारखे पात्र साकारण्याऐवजी नेहमी नवीन प्रयोग करू पाहिला.
21 ऑक्टोबर 1931ला मुंबईमध्ये जन्मलेले शम्मी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते होते. घरात सिनेमांचे वातावरण असल्याने शम्मी कपूर यांची रुचीसुध्दा अभिनयात निर्माण झाली. 1953मध्ये रिलीज झालेल्या \'जीवन ज्योती\' सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून एंट्री केली. त्यांनी इंडस्ट्रीला \'तुमसा नही देखा\', \'कश्मीर की कली\', \'जानवर\' आणि \'पगला कही का\'सारखे हिट सिनेमे दिले. 1950पासून 1970पर्यंत अभिनय आणि डान्सिंगच्या माध्यमातून लोकांना दीवाने केले. शम्मी कपूर राष्ट्रीय पुरस्कार विजेते होते. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ओळख निर्माण करणा-या शम्मी कपूर यांनी 14 ऑगस्ट 2011ला जगाचा निरोप घेतला. त्यांना \'रॉकस्टार\' हा अखेरचा सिनेमा होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या शम्मी कपूर यांच्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टी...