आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सेटवर खुर्च्या उचलताना दिसला होता भारताचा पहिला अॅक्शन-डान्सिंग सुपरस्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान दादांना भारतातील पहिले डान्सिंग आणि अॅक्शन सुपरस्टारच्या रुपात ओळखले जाते. असे म्हटले जाते, की स्वतः अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांची स्टाइल कॉपी करुन डान्स करणे सुरु केले होते. मात्र एकेकाळच्या या सुपरस्टारला त्याच्या शेवटच्या काळात सेटवर खुर्ची उचलण्याची कामे करावी लागली होती. १०३ व्या जयंतीनिमित्त लेखक दिलीप ठाकुर सांगताहेत भगवान दादांच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...

दिलीप ठाकुर यांना आलेल्या एक अनुभव शेअर करताना त्यांनी सांगितले, ''वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत 'प्यारी बहना' (१९८५) या सिनेमाच्या सेटवर एक घटना घडली होती. मी पद्मिनी कोल्हापुरेची भेट घ्यायला तेथे पोहोचलो होतो. शूटिंगच्या वेळी एखाद्या कलाकाराची भेट घेणे म्हणजे दीर्घ प्रतिक्षा करणेच असते. तेवढ्या काही पाहुणे पद्मिनीजींची भेट घ्यायला सेटवर पोहोचले. पाहुण्यांना बसायला तेथे खुर्च्या कमी पडल्या. हे बघून स्पॉटबॉयने इकडे-तिकडे नजर फिरवली. कोप-यात बसलेल्या एका व्यक्तीला त्या स्पॉटबॉयने खुर्ची रिकामी करायला सांगितली, तो म्हणाला, "उठा, मॅडमच्या पाहुण्यांना खुर्ची द्यायची आहे." मी जवळ जाऊन पाहिले तर स्पॉटबॉय भगवान दादांना खुर्ची द्यायला सांगत होता. हे बघून मला खूप वाईट वाटले. एक काळ गाजवणा-या या 'अलबेला' कलाकाराला दुस-या तिस-या पिढीतील कलाकारांसोबत काम करताना अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर भगवान दादांना कॉमन मेकअप रुममध्ये बसावे लागायचे.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, भगवान दादांच्या आयुष्याची ही कथा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...