आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: रेखा यांच्यामुळे जया यांच्या वैवाहिक जीवनात आले होते वादळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- जया आणि अमिताभ बच्चन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला राजनेता जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये झाला. जया यांना पहिला ब्रेक महान सिनेमा निर्माते सत्यजीर रे यांनी दिला. 'महानगर' या बंगाली सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. 1963मध्ये जया यांना हा सिनेमा मिळाला तेव्हा त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या. त्यानंतर सत्यजीत रे यांच्याशी प्रेरित होऊन फिल्म अँड टेलिव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (पुणे)मध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी अभिनयात गोल्ड मेडल नावी केले. त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गुड्डी' सिनेमातम मुख्य भूमिका साकारली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि जया यांना रात्रीतून लोकप्रिय मिळाली.
'गुड्डी'नंतर त्यांनी एकामागून एक अनेक सिनेमे केले. काही हिट ठरले तर काही फ्लॉप. या काळात त्यांनी 'उपहार' (1971), 'जवानी दीवानी' (1972), 'बावर्ची' (1972), 'परिचय' (1972), 'कोशिश' (1972) या सिनेमांसह अनेक सिनेमात अभिनय केला. 1972मध्ये आलेल्या 'कोशिश' या सिनेमानंतर ऋषिकेश मुखर्जी जयाचे आवडते दिग्दर्शक बनले. त्यानंतर जया यांनी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'अभिमान' (1973), 'मिली' (1975) आणि 'चुपके चुपके' (1975) या सिनेमात काम केले.
पुण्यात झाली अमिताभ आणि जया यांची भेट-
जया आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट पुण्याच्या फिल्म इंस्टीट्यूटमध्ये झाली. कालांतराने दोघांची भेट प्रेमात रुपांतरित झाली. 'गुड्डी'च्या सेटवर दोघांचे प्रेम वाढत गेले. लग्नापूर्वी दोघे एकमेकांना तीन वर्षे भेटत होते. विशेष म्हणजे, जया आणि अमिताभ यांचे सुत जुळले तेव्हा जया सुपरस्टार होत्या आणि बिग बी करिअरसाठी संघर्ष करत होते. 1973मध्ये अमिताभ यांचा 'जंजीर' हिट झाला त्यानंतर त्यांनी लंडनला जाण्याची योजना केली. परंतु याची भनक बिग बींचे वडील डॉ. हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांना लागली. त्यांनी दोघांना आधी लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अगदी साध्या पध्दतीने दोघे लग्नगाठीत अडकले आणि लंडनला रवाना झाले.
जया यांचे वैवाहिक जीवन-
बॉलिवूडमध्ये जया आणि अमिताभ बच्चन यांचे वैवाहिक आयुष्य एखाद्या आदर्शाप्रमाणे आहे. 3 जून 1973 दोघे लग्नगाठीत अडकले आणि त्यांना आता मुलगी श्वेता आणि मुलगी अभिषेक बच्चन ही दोन मुले आहेत.
राजेश खन्ना यांना नापसंत होते जय-अमिताभ यांचे नाते-
सुपरस्टार राजेश खन्ना जया बच्चन यांचे जवळचे मित्र होते. त्यांना जया आणि अमिताभ बच्चन यांचे नाते पसंत नव्हते. राजेश खन्ना यांनी अनेकदा जया यांना सांगितले होते, की अमिताभ यांना भेटू नकोस. असे सांगितले जाते, की अमिताभ जया यांनी भेटण्यासाठी 'बावर्ची' सिनेमाच्या सेटवर जात होते, तेव्हा राजेश खन्ना त्यांना दुर्लक्षित करत होते.
जेव्हा जया यांच्या वैवाहिक आयुष्यात आले वादळ-
रेखाने जेव्हा जया आणि अमिताभ यांच्या वैवाहिक आयुष्यात एंट्री केल्यानंतर त्यांच्या नात्याने वेगळे वळण घेतले होते. अमिताभ आणि रेखा यांची पहिली भेट 'दो अनजाने'च्या सेटवर झाली होती. या सिनेमात रेख आणि अमिताब यांनी काम केले होते. यादरम्यान अमिताभ आणि रेखा एकमेकांना भेटू लागले आणि दोघांची जवळीक वाढली होती. दोघांच्या रोमान्सचे किस्से त्याकाळी वर्तमानपत्रात चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर जया, अमिताभ आणि रेखा यांचे लव्ह ट्रँगलला यश चोप्रा यांनी 'सिलसिला'मधून दाखवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जया आणि अमिताभ बच्चन यांची लग्नापासून ते आतापर्यंतची खास छायाचित्रे...