आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Ann: सिनेमाच्या कथेला साजेशी होती गायक मुकेश यांची लव्ह स्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुकेश यांचे अभिनेता राज कपूर, पत्नी सरला आणि मुलांसोबतचे फोटो)
मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश चंद्र माथुर आज आपल्यात असते तर 92 वर्षांचे असते. 22 जुलै 1923 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेले मुकेश अॅक्टर राज कपूर यांचा आवाज म्हणून ओळखले जात होते. म्हणून मुकेश यांचे 27 ऑगस्ट 1976 रोजी निधन झाल्यानंतर राज कपूर म्हणाले होते, की मी माझा आवाज गमावला आहे. मुकेश यांनी आपल्या गायन करिअरमध्ये 'नैना है जादू भरे...' (बेदर्द जमाना क्या जाने), 'मुझको इस रात की तनहाई में...' (दिल भी तेरा हम भी तेरे), 'वक्त करता जो वफा...' (दिल ने पुकारा), 'दीवानों से ये मत पूछो...'(उपकार), 'कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे...' (पूरब और पश्चिम), 'दर्पण को देखा...(उपासना), 'जो तुमको हो पसंद...' (सफर) और 'जाने कहा गए वो दिन...' (मेरा नाम जोकर)सारखे अनेक लोकप्रिय गाणे गायले.
1974मध्ये 'रजनीगंधा' सिनेमातील 'कई बार यू ही देखा' गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय त्यांना या गाण्यासाठी अनेक नामांकन आणि पुरस्कारसुध्दा मिळाले होते. त्यांनी चारवेळा (सब कुछ सिखा हमने (अनाडी, 1959), सबसे बडा नादान (पहचान, 1970), 'जय बोलो बेईमान की' (बे-ईमान, 1972) आणि 'कभी कभी मेरे दिल मे' (कभी कभी, 1976)साठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कार मिळाले होता.
अशी झाली गायनाची सुरुवात-
कायस्थ कुटुंबात जन्मलेले मुकेश यांचे वडील जोरावर चंद्र माथुर इंजिनिअर होते आणि आई राणी गृहीणी होत्या. मुकेश यांनी 10ला असतानाच शिक्षण सोडून दिले होते आणि लोकनिर्माण विभागात काम करत करून लागले होते. यादरम्यान त्यांनी व्हाइस रेकॉर्डिंग सुरु केली आणि हळू-हळू गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. गतकाळातील प्रसिध्द अभिनेता मोतीलाल यांनी मुकेश यांचा आवाज त्यांच्या बहिणीच्या लग्नात ऐकला आणि मोतीलाल यांनी मुकेश यांनी नोटिस केले. त्यानंतर मोतीलाल यांनी मुकेश यांना मुंबईला आणले आणि पंडित जगन्नाथ प्रसादकडून गायनाचे शिक्षण घेण्यास सांगितल. 1941मध्ये 'निर्दोष' सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केले. यादरम्यान 'दिल ही बुझा' गाणेदेखील त्यांनी गायले. गायक मुकेश यांना पहिला ब्रेक मोतीलाल यांच्या 'पहिली नजर' (1945) सिनेमातून मिळाला. या सिनेमाचे गाणे 'दिल जलता है तो जलने दो' खूप लोकप्रिय झाले होते. त्या नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
एखाद्या सिनेमाप्रमाणे आहे मुकेश यांची लव्ह-लाइफ-
मुकेश यांची लव्हलाइफ एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये. सांगितले जाते, की त्यांचे अफेअर गुजराती मिलेनिअर रायचंद त्रिवेदी यांची मुलही सरला त्रिवेदीशी चालू होते. त्याकाळीत सिनेमात गाणे गायच्या करिअरला चांगले मानत नव्हते. म्हणून रायचंद यांची आपल्या मुलीने मुकेशशी विवाह करू नये अशी इच्छा होती. त्यांनी दोघांना वेगळे करण्याचा लाख प्रयत्न केला, मात्र अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांची मदत केली आणि कांदिवलीच्या एका मंदिरात मुकेश यांनी सरलासोबत लग्न केले. विशेष म्हणजे, मुकेश यांचे लग्न त्यांच्या वाढदिवसाच्या (22 जुलै 1946) दिवशी झाले. मुकेश आणि सरला यांचा पाच मुले झाली. रीता, नितिन, नलिनी, मोहनीश आणि नम्रता (अमृता). नितिनने वडिलांचा मार्ग धरला आणि गायनात करिअर केले. मात्र तो वडिलांप्रमाणे यशस्वी होऊ शकला नाही. मुकेश यांचा नातू नील नितीश मुकेश बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून करिअर करत आहे.
हार्ट अटॅकने झाले निधन-
27 ऑगस्ट 1976 रोजी डेट्रॉइट, मिशिगन (US)मध्ये मुकेश यांचे निधन झाले होते. ते तिथे एका कॉन्सर्टनिमित्त गेले होते. 27 ऑगस्टच्या दिवशी ते लवकर उठून अंघोळीसाठी गेले असता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टर्सने हार्टअटॅक सांगून त्यांना मृत घोषित केले. मुकेश यांनी अर्धवट सोडलेले कॉन्सर्ट लता मंगेशकर यांनी पूर्ण केले होते. त्यांनी मुकेश यांचा मृतदेश भारतात आणला होता. मुकेश यांच्या अंत्यसंस्कारात बॉलिवूडचे जवळपास त्याकाळचे सर्वच कलाकार उपस्थित होते.
'धर्मवीर' (1977), 'अमर अकबर अँथॉनी' (1977), 'प्रेमिका' (1980), 'मैला आंचल' (1981), 'आरोही' (1982), 'लव अँड गॉड' (1986) आणि 'चंद्र ग्रहण' (बंगाली, 1997)सारख्या अनेक सिनेमे मुकेश यांच्या निधनानंतर रिलीज झालेत, या सिनेमांतील गाण्यांना त्यांनी आवाज दिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुकेश यांचे दुर्मिळ फोटो...